Pune Temperature: देशात सर्वाधिक तापलेल्या शहरांच्या यादीत पुण्याचा समावेश; शहराच सरासरी तापमान 35 अंशावर
राज्यात गेल्या 48 तासांमध्ये तापमानात मोठे बदल झाले असून राज्यातील सर्वाधिक तापमान पुणे शहरात असल्याचे दिसून येत आहे.

Pune Weather:फेब्रुवारीच्या दुसऱ्याच आठवड्यात राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढलाय. काही दिवसांपूर्वी पहाटेचा गारवा सोडल्यास यंदा शहरात थंडी जाणवली नाही. गेल्या 48 तासात पुणे शहरात तापमानात मोठे बदल झाले असून शहराचा सरासरी पारा 35 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला आहे. पुणे शहर देशातील सर्वाधिक तापलेल्या शहरांच्या यादीत गेलं आहे. (Temperature) 1 फेब्रुवारीला पुण्यातील कोरेगाव पार्क कमाल तापमान 31.5 अंश सेल्सिअस होते. आठ फेब्रुवारीला तब्बल 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. राज्यातील सर्वाधिक तापमान पुणे शहरात असल्याचे हवामान विभागाच्या अहवालातूनही दिसून येत आहे. (Temperature Update Pune)
सर्वाधिक तापलेली शहरं कोणती?
राज्यात गेल्या 48 तासांमध्ये तापमानात मोठे बदल झाले असून सोलापूर , वर्धा ,अकोला , अमरावती , बुलढाणा आणि पुणे शहरात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली .कोरेगाव पार्क भागात शुक्रवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली .पुण्यात किमान व कमाल तापमान गेल्या काही दिवसांपासून चढेच असल्याचे दिसून आले .वाढत्या तापमानामुळे नागरिकांना कमालीचा उकाडा आणि उन्हाचा चटका बसत आहे .फेब्रुवारीतच एप्रिलप्रमाणे उन्हाळा जाणवत आहे . उन्हाच्या जळांनी अंगाची काहीही होत असल्याचं नागरिक सांगतायत .
जानेवारी महिन्यात थंडी कमीच
राज्यभरात जानेवारी महिन्यात सर्वात कमी थंडीची नोंद झाली . नोव्हेंबर ते जानेवारी या हिवाळ्याच्या तीनही महिन्यात 25 ते 31 डिसेंबर तीव्र थंडीचे होते .त्यानंतर तापमानात चढउतारच जाणवला .ढगाळ वातावरण ,उत्तरेतील थंडीची लाट तर दक्षिणेत कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यातील तापमानावर मोठा परिणाम झाला .त्यामुळे देशभरात फेब्रुवारीत सर्वाधिक उन्हाचा तडाखा बसत असून सध्या कोरड्या व शुष्क वाऱ्यांच्या सक्रियतेने महाराष्ट्रात उष्णतेच्या झळा आणि तापमानाचा चटका वाढलाय .
पुण्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाची नोंद
-
कोरेगाव पार्कमध्ये राज्यातील उच्चांकी तापमान
- मागील 48 तासांच्या अभ्यासानुसार, पुण्यातील कोरेगाव पार्क येथे राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.
- सोलापूर, वर्धा, अकोला, अमरावती आणि बुलडाणा ही तापमानवाढीच्या यादीत आहेत.
- 9 फेब्रुवारी रोजी कोरेगाव पार्क येथे कमाल तापमान 37°C नोंदवले गेले, जे राज्यात सर्वाधिक होते.
-
कोरेगाव पार्कमधील तापमानाचा वाढता ट्रेंड
- 1 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीतील कमाल तापमानाचा आलेख दर्शविला आहे.
- या काळात तापमान हळूहळू वाढले असून 9 फेब्रुवारीला 37°C वर पोहोचले.
- हवामानतज्ज्ञांच्या मते, प्रदूषण आणि शहरीकरणामुळे पुण्यात तापमान झपाट्याने वाढत आहे.
हेही वाचा:























