एक्स्प्लोर

पुण्यात भलंमोठं होर्डिंग कोसळलं, शहरात धुव्वाधार; राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वीज पडून जनावरे ठार

सकाळपासूनच आज पुण्यात अंशतः ढगाळ वातावरण दिसून आलं, त्यामुळे वरुण राजाची कृपावृष्टी होणार असा अंदाज लावला जात होता.

पुणे : मुंबई, पुणे, (Pune) कोकणासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात वळवाच्या पावसाने (Rain) दमदार हजेरी लावली असून वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाटही पाहायला मिळत आहे. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली असून मध्यवर्ती भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दुपारनंतर पुण्यातील विविध भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याचं चित्र पाहायला मिळालं. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळ सणसवाडी येथे ही हार्डिंग कोसळल्याची घटना घडली असून 7-8 दुचाकी या होर्डिंग्जखाली अडकल्याची माहिती आहे. सुदैवाने कुणीही जखमी झालं नसल्याचेही समजते.

सकाळपासूनच आज पुण्यात अंशतः ढगाळ वातावरण दिसून आलं, त्यामुळे वरुण राजाची कृपावृष्टी होणार असा अंदाज लावला जात होता. त्यातच, हवामान विभागाने देखील पुण्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, पुण्यातील विमानतळ परिसरात मुसळधार पाऊस सुरु झाला. विमानतळ्याच्या नव्या टर्मिनलवर पुन्हा एकदा पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. येथील ड्रेनेज लाईनमधून पाणी बाहेर येत होतं. अचानक पाऊस आल्याने आणि टर्मिनलवर पाणी साचल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली.

एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे वादळी वाऱ्याने वातावरण बदलून गेलंय. पुण्यात मुसळधार पावसात भलंमोठं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. या होर्डिंगखाली 7 ते 8 दुचाकी अडकल्या आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळ सणसवाडी येथे ही हार्डिंग कोसळल्याची घटना घडली. 

जालन्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

जालना जिल्ह्यात सलग मागील पाच दिवसापासून अवकाळी पाऊस बरसतो आहे. आज सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास जालना शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत आहे. जालना राजुर रोडवरील एका मंगल कार्यालयातील लग्नाचा मंडप देखील या वादळी वाऱ्यामुळे कोसळला आहे. पुढील तीन दिवस जालना जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला असून प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचा आवाहन केलं आहे.

सोलापुरात पाऊस

सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, करमाळा,पंढरपूर या भागात पूर्व मोसमी पावसाला जोरदार सुरुवात झालीय. हंगामातील पहिला जोराचा पाऊस आज झालाय. या पावसान शेतातून पाणी वाहिलंय. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. पाण्याच्या कमतरतेमुळे ऊसासह शेतकऱ्यांची लहान सान पिकं वाया चालली होती. मात्र, या पावसानं शेतकऱ्यांना तारलं आहे.

तळकोकणात मुसळधार वळवीचा पाऊस

तळकोकणातही पावसाच्या सरी कोसळत असून कुडाळ, कणकवली, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी तालुक्यात धुव्वाधार पाऊस सुरू आहे. विजांच्या कडकडाटासह 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहत असून जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच भागात धुव्वाधार पाऊस कोसळत आहे.

गुहागरमध्ये जोरदार पाऊस

मागील अर्ध्या तासापासून गुहागर मधील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानंतर तालुक्यातील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. 

जामनेरमध्ये वीज कोसळून 4 म्हशी ठार

वीज कोसळून चार म्हशी जागीच ठार झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यात सुनासगाव येथे घडली आहे. या घटनेने गावातील शेतकरी गोपाल इंधाते यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील सदस्याप्रमाणे जीव लाऊन सांभाळलेल्या म्हशी वीज कोसळून दगावल्याने या परिवाराच्या उदर निर्वाहाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे, कुटुंबातील महिलांकडून मोठा आक्रोश पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा

दिल्लीतून उद्धव ठाकरेंना फोन, विदेशी जाणाऱ्या शिष्टमंडळात ठाकरेंच्या खासदारालाही स्थान; काय म्हणाले केंद्रीयमंत्री

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
T 20 World cup 2026: मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?
मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Bhandara : भंडारा नगर परिषदेत गुलाल कुणाचा? नागरिक काय म्हणाले?
Mahapalikecha Mahasangram Gondia : तरुणांच्या रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर, गोंदिया करांचा कौल कुणाला?
Supreme Court On Election : स्था.स्व.संस्थांच्या निवडणुका अजूनही टांगणीलाच, कोर्टाची पुढील सुनावणी शुक्रवारी
Baramati Ganesh Market : कोटींची मंडई,भाजी विक्रेत्यांचे हाल; रोखठोक बारामतीकारांशी संवाद
Bajrang Sonawane on Dhananjay Munde : खूप आठवण येत असेल तर भेटायला जा, धनंजय मुंडेंना सल्ला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
T 20 World cup 2026: मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?
मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
माजी आमदार निर्मला गावित यांना कारने उडवले, अपघाताची भीषण घटना; रुग्णालयात उपचार सुरू
माजी आमदार निर्मला गावित यांना कारने उडवले, अपघाताची भीषण घटना; रुग्णालयात उपचार सुरू
गौरीच्या आई-वडिलांशी बोलल्या, अनंत गर्जेच्या वकिलावर संतापल्या अंजली दमानिया; म्हणाल्या, ते ॲब्सुलेटली रबीश
गौरीच्या आई-वडिलांशी बोलल्या, अनंत गर्जेच्या वकिलावर संतापल्या अंजली दमानिया; म्हणाल्या, ते ॲब्सुलेटली रबीश
Bollywood Drug Case: शक्ती कपूरच्या लेकाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी, सिद्धांत कपूर मुंबई पोलिसांचं समन्स
मोठी बातमी : शक्ती कपूरच्या लेकाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी, सिद्धांत कपूर मुंबई पोलिसांचं समन्स
Embed widget