(Source: ECI/ABP News/ABP Majha)
किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आठ शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल
BJP leader Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी पुणे महानगरपालिकेत हल्ला करण्यात आला होता. पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी सात ते आठ शिवसैनिकांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
BJP leader Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी पुणे महानगरपालिकेत हल्ला करण्यात आला होता. शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे आणि त्याची काही साथीदार सोमय्या यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. परंतु त्या ठिकाणी झटपट झाल्यानंतर शिवसैनिकांनी सोमय्या यांच्यावर हल्ला केला होता. पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी सात ते आठ शिवसैनिकांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 143, 147, 149, 341, 336, 337 यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना शनिवारी पुण्यात शिवसेनेकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे. या झटापटीत सोमय्या हे पायऱ्यांवर कोसळले. त्यांमुळे त्यांना दुखापत झाली. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. संचेती रुग्णालयात जाऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्या यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधीर शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. किरीट सोमय्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही लोकशाही आहे की गुंडाराज, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला.
किरीट सोमय्या यांना मारण्याचा डाव होता. एकजण त्यांच्यामागे दगड घेऊन धावत होता. हा जीवघेणा हल्ला होता. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच हल्ला करतायत. ही लोकशाही आहे की गुंडाराज आहे. पुणे महापालिकेची सुरक्षा यंत्रणा काय करत होती? पुणे पोलीस काय करत होते? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. सत्य कधीच लपणार नाही. अनिल देशमुखांनी सांगितलंय की अनिल परब बदल्यांची यादी घेऊन यायचे. उद्धव ठाकरे यांचे नाव त्यात आले आहे, असेही पाटील म्हणाले.
पुणे पोलिसांकडून स्वतःहून स्यु मोटो पद्धतीने या प्रकरणात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ. कारण ही दंगल होती. या सरकारला आम्ही न्यायालयात गेल्यावर प्रत्येकवेळी न्यायालयाने लथाडलय. भाजप गप्प बसणार नाही. किरीट सोमय्यांची केंद्र सरकारकडून देण्यात आलेली सी.आय.एस.एफची सुरक्षा व्यवस्था नसती तर त्यांना श्रद्धांजली व्हावी लागली असती, असेही पाटील म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Lata Mangeshkar Death : गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
-
चिंताजनक! SARS-CoV 2 शरीरात सुमारे 7 महिन्यांपर्यंत राहतो सक्रिय, अभ्यासात उघड
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha