एक्स्प्लोर

Pune Metro tunnel: वाड्यासाठी बोअरवेल खोदली, थेट मेट्रोच्या बोगद्याला खड्डा पडला; शिवाजीनगर ते स्वारगेट जाणाऱ्या भूमिगत मेट्रोमार्गिकेवरील हादरवणारा प्रकार, काय घडलं?

Pune Metro tunnel: मेट्रोच्या बोगद्याला खड्डा पडला ही बाब मेट्रो अधिकाऱ्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी थेट खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली

पुणे: पुण्यात शिवाजीनगर ते स्वारगेट जाणाऱ्या भूमिगत मेट्रोमार्गिकेवर बोरवेलमुळे खड्डा पडल्याचा (Pune Metro tunnel) प्रकार समोर आला आहे. पुण्यातील शुक्रवार पेठ परिसरात एका वाड्याच्या बांधकामासाठी बोरवेलची खोदाई सुरू होती आणि याच दरम्यान बोरवेलची खोदाई थेट मेट्रोच्या मार्गीकेपर्यंत (Pune Metro tunnel) जाऊन पोहोचली. त्यामुळे मेट्रोच्या बोगद्याला खड्डा पडला. ही बाब मेट्रो अधिकाऱ्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी थेट खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. याप्रकरणी खडक पोलिसांनी घरमालक तुषार मोठे आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि खड्डा सिमेंट काँक्रीटने बुजवण्यात आले.(Pune Metro tunnel)

पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गावरती हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवार पेठेत अनधिकृतपणे बोअरवेलचे खोदकाम करत असताना मेट्रोच्या बोगद्याला तब्बल ६ इंची छिद्र पडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पुणे मेट्रो प्रशासनाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी घरमालक आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे.(Pune Metro tunnel)

नेमकी घटना काय?

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महा-मेट्रो) ने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १४ मार्च रोजी शिवाजी रोडवरील खडक पोलीस चौकीच्या समोरील एका निवासी मिळकतीजवळ (घर क्र. ४१५) घडली. येथे जुना वाडा पाडून नवीन बांधकाम सुरू होते. या जागेवर बोअरवेल खोदत असताना ड्रिल थेट ६० ते १०० फूट खाली असलेल्या मेट्रोच्या बोगद्यापर्यंत पोहोचले आणि बोगद्याच्या काँक्रीट अस्तरला (Lining) छिद्र पडले.

स्वारगेट आणि मंडई स्थानकांदरम्यान बोगद्यात अचानक पाणी साचत असल्याचे ऑपरेटर भूषण बरिंगे यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. मेट्रोच्या तांत्रिक पथकाने तपासणी केली असता, टनेल लाईन क्र. १५/५६ आणि रिंग क्र. ४७१ जवळ ६ इंची छिद्र पडल्याचे आणि तिथून मोठ्या प्रमाणावर पाणी झिरपत असल्याचे दिसून आले.

अनधिकृत खोदकाम नडले

मेट्रोच्या नियमांनुसार, मेट्रो मार्गिकेच्या परिसरात कोणतेही खोदकाम किंवा बोअरवेल करण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागते. मात्र, घरमालक धनंजय मोटे आणि संबंधित कंत्राटदाराने कोणतीही परवानगी न घेता सुमारे ६० फुटांपर्यंत बोअरवेलचे खोदकाम केले. यामध्ये मेट्रोच्या संरचनेचे सुमारे २.५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला होता.

पुणे मेट्रोचे संयुक्त महाव्यवस्थापक शंतनू गौरात्र यांनी याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सांगितले की, "मेट्रो प्रशासनाच्या तक्रारीवरून आम्ही घरमालक आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे. मेट्रोच्या मालमत्तेचे नुकसान करणे आणि प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण करणे याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे." १७ मार्चपर्यंत ही गळती रोखण्यात मेट्रोला यश आले असले तरी, अशा प्रकारच्या अनधिकृत कामांमुळे मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशारा महा-मेट्रोने दिला आहे.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: पुण्यातील नवले पुलाजवळच्या लॉजवर सुरू होता नको तो प्रकार; पोलिसांना टीप मिळाली, बनावट ग्राहक पाठवला अन्....; 9 मुलींची झाली सुटका
पुण्यातील नवले पुलाजवळच्या लॉजवर सुरू होता नको तो प्रकार; पोलिसांना टीप मिळाली, बनावट ग्राहक पाठवला अन्....; 9 मुलींची झाली सुटका
Sunetra Pawar and Ajit Pawar : 'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
Maharashtra Weather Rain Updates: मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचं कमबॅक; पुढील 4 दिवस कुठेकुठे कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचं कमबॅक; पुढील 4 दिवस कुठेकुठे कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल

व्हिडीओ

Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar and Ajit Pawar : 'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
Amitabh Bachchan Shares Health Update: अमिताभ बच्चन यांच्यावर महत्त्वाची शस्त्रक्रिया; स्वतः बिग बींनी दिली हेल्थ अपडेट, म्हणाले, 'रिकव्हरीचा काळ खूप कठीण...'
अमिताभ बच्चन यांच्यावर महत्त्वाची शस्त्रक्रिया; ICU मध्ये केलेलं दाखल, बिग बींना नेमकं झालंय तरी काय?
Uddhav Thackeray Abhijeet Dipke CJP Protest Delhi Jantar Mantar: जंतर मंतरवर भाषण केलं, मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवलं, पुढे काय घडलं?, VIDEO
जंतर मंतरवर भाषण केलं, मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवलं, पुढे काय घडलं?, VIDEO
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
Ajit Pawar and Sunetra Pawar: रात्री 12 वाजता सुनेत्रावहिनी अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या अन्...
रात्री 12 वाजता सुनेत्रावहिनी अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या अन्...
Rahul Gandhi: एकाच पायात बूट, पोलिसांच्या ताब्यातून सुटताच राहुल गांधींचा विद्यार्थी अन् पंतप्रधानांना थेट संदेश, म्हणाले, माझ्या तीनच मागण्या....
एकाच पायात बूट, पोलिसांच्या ताब्यातून सुटताच राहुल गांधींचा विद्यार्थी अन् पंतप्रधानांना थेट संदेश, म्हणाले, माझ्या तीनच मागण्या....
Ajit Pawar Birth Anniversary : दादा... काळीज पिळवटून निघतंय, सगळंच पोरकं झालंय; अजित दादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट, स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन
दादा... काळीज पिळवटून निघतंय, सगळंच पोरकं झालंय; अजित दादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट, स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
Embed widget