Ajit Pawar : मी जे सांगायचे ते सांगितलं, मला मूर्ख समजू नका; 'त्या' प्रश्नावरुन अजित पवारांनी पत्रकारांना फटकारलं!
अजित पवारांनी विजय शिवतारेंसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी अजित पवारांनी मला मूर्ख समजू नका, म्हणत पत्रकारांना फटकारलं आहे.
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार ((Ajit Pawar) हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जातात. याच स्पष्टवक्तेपणामुळे ते अडचणीत आल्याचं अनेकदा पाहिलं आहे. त्यासोबतच अजित पवार हे कायम पत्रकारांना फटकारत असतात. आजदेखील त्यांनी पत्रकारांना एका प्रश्नावरुन फटकारलं आहे. अजित पवार हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुले वाड्यात अभिनवादन करण्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांना फटकारलं आहे.
नेमकं काय घडलं?
अजित पवारांनी फुलेंना अभिवादन केलं. मिसळीचा आस्वाद घेतला आणि माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एका पत्रकाराने अजित पवारांना विजय शिवतारेंना कोणाकोणाचे फोन आले होते? हे सांगा, असा प्रश्न विचारला. त्यावेळी अजित पवार पत्रकारांवर चांगलेच भडकलेले दिसले. मी विजय शिवतारेंसंदर्भात सगळं सांगितलं आहे. मी जे सांगायचं ते सांगितलच आहे. काहीही विचारू नका. मी मूर्ख नाही. मला मूर्ख समजू नका, असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांना फटकारलं आहे. काही दिवसांपूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांनी गौप्यस्फोट केला होता. विजय शिवतारेंना कोणत्या जेष्ठ नेत्यांचे फोन आले हे मला माहित आहे. विजय शिवतारेंनी मला ते फोन दाखवले असल्याचं म्हणाले होते. त्यावर प्रश्न विचारण्यात आला होता.
सासवडच्या सभेसंदर्भात काय म्हणाले?
विजयराव शिवतारे स्वतः एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस मी आणि विजयराव बसलो होतो. त्याच वेळेस त्यांच्या भागातले काही महत्त्वाचे विषय आहेत आणि पिण्याचा पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे काही भागातल्या एमआयडीसीच्या संदर्भातला बारामती लोकसभा मतदारसंघातला मुद्दा आहे. यावर आम्ही चर्चा केली. त्यावेळी महायुतीच्या बरोबर आहे परंतु हे विषय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मार्गी लावले पाहिजेत ते काही पुरंदर विधानसभा मतदारसंघ आणि काही बारामती लोकसभा मतदारसंघ भोर मधला काही भाग आहेत इतर भागातले बारामती भागातले अशा वेगवेगळ्या भागातले त्यांचे विषय आहेत त्या विषयाला कुठेतरी मदत व्हावी,अशी मागणी शिवतारेंनी केली होती. त्यावेळी त्यांनी सभा आयोजित कऱणार असल्याचं सांगितलं होतं आणि मुख्यमंत्र्यांनीदेखील सभेला येऊ, असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे आज सासवडमध्ये सभा आयोजित करण्यात येणार आहे, असं अजित पवार सासवडच्या सभेसंदर्भात म्हणाले.
इतर महत्वाची बातमी-