एक्स्प्लोर

Ajit Pawar : मंत्रिमंडळातील फिट मंत्री कोण? अजित पवारांनी थेट नावच सांगून टाकलं...

आमच्या मंत्रिमंडळात सर्वात फिट मंत्री गिरीश महाजन आहेत. ते साठीच्या पुढे गेले पण कुणीच म्हणणार नाही की ते साठीच्या पुढे गेले, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गिरीश महाजनांच्या फिटनेसचं कौतुक केलं.

Ajit Pawar : आमच्या मंत्रिमंडळात सर्वात फिट मंत्री गिरीश महाजन (Girish mahajan) आहेत. ते साठीच्या पुढे गेले पण कुणीच म्हणणार नाही की ते साठीच्या पुढे गेले, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गिरीश महाजनांच्या फिटनेसचं कौतुक केलं आहे. पुण्यातील महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात ते बोलत होते. 
 
ते पुढे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी इर्शाळवाडी सारख्या ठिकाणी गिरीश महाजन ट्रेकिंग करत गेले होते. महाजनांनी आरोग्य फिट ठेवलं आहे. महाजनांचा दंड मी नेहमीच दाबून बघतो. ते खूप फिट आहेत. त्यामुळे आमच्या मंत्रिमंडळात सर्वात फिट तेच आहेत.
 
स्व. आमदार विनायक निम्हण यांच्या जयंती निमित्त आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सुरेश नवले, अर्जुन खोतकर, आमदार प्रसाद लाड, सिद्धार्थ शिरोळे, सनी निम्हण, आरोग्य संचालक डॉ. अजय चंदनवाले आणि राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोविड काळाने आरोग्यसेवा सर्वात जास्त महत्वाची असल्याचे दाखवून दिले. राज्य शासनानेदेखील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आरोग्यसेवेसाठी पुरवणी मागण्यांमध्ये 210 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात 700 ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 2 हजार 418 संस्थांमध्ये नि:शुल्क उपचार होणार आहेत. राज्यात ॲडेनो व्हायरसमुळे डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात पसरली असून पुण्यात साथीचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांनी डोळ्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

पावसाळ्याचे दिवस असल्याने आरोग्य विभागामार्फत साथजन्य आजारांपासून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. साथीच्या आजारावर नियंत्रण करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून प्राथमिक टप्प्यातच अशा आजाराचे निदान झाल्यास रुग्णांचा त्रास कमी होतो. मात्र उपचारासोबत आजार होऊ नये यासाठी दररोज व्यायाम करणे, व्यसनापासून दूर राहणे, सकस आहार घेणे, वेळेवर आरोग्य तपासण्या करणे, तणावमुक्त जीवन जगणे गरजेचे आहे. प्रकृतीची काळजी घेताना जीवनशैलीत बदल आणायला हवा. आरोग्य शिबिरात मोफत वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. स्व. विनायक निम्हण यांनी सामाजिक कार्य करताना चांगल्या प्रकारची मैत्री जोपासली असेही श्पवार म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mumbai Alert : मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? पोलिसांना फोन, ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोटाची धमकी

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
Sunetra Pawar on Finance Ministry: अर्थ खातं कोणाकडे? प्रश्नावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उत्तराने भुवया उंचावल्या; म्हणाल्या...
अर्थ खातं कोणाकडे? प्रश्नावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उत्तराने भुवया उंचावल्या; म्हणाल्या...
Pune News: पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये बॉलिवूड स्टार्सच्या कार्यक्रमात गोंधळ; शाहिद कपूरला पुण्यात धक्काबुक्की; नियोजनाचा कलाकारांना फटका
पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये बॉलिवूड स्टार्सच्या कार्यक्रमात गोंधळ; शाहिद कपूरला पुण्यात धक्काबुक्की; नियोजनाचा कलाकारांना फटका
Rain Updates: पावसाची तूट भरून निघणार, भारतात चांगला मान्सून कोसळणार; जपान आणि अमेरिकी संस्थेचा दिलासादायक अंदाज, नेमकं काय म्हटलंय?
पावसाची तूट भरून निघणार, भारतात चांगला मान्सून कोसळणार; जपान आणि अमेरिकी संस्थेचा दिलासादायक अंदाज, नेमकं काय म्हटलंय?

व्हिडीओ

Pune Rain : अर्धा जून संपला तरी पुण्यात पाऊसच नाही, 2014 नंतर प्रथमच पुण्यात 15 जूनपर्यंत पाऊस नाही
America Iran Agreement : कसा आहे शांती करार? लेबनॉनसह सर्व आघाड्यावर कायमची शस्त्रसंधी
Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur Accident: तीन माय-लेकरांसह आजीचा अंत; एकाच अपघातात सर्व काही हिरावलं; तांदूळवाडी दुर्घटनेत एकाच रात्री आठ जणांवर अंत्यसंस्कार
तीन माय-लेकरांसह आजीचा अंत; एकाच अपघातात सर्व काही हिरावलं; तांदूळवाडी दुर्घटनेत एकाच रात्री आठ जणांवर अंत्यसंस्कार
TMC Rebel MP : तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांचा NCPI मध्ये विलीन होण्याचा निर्णय, खासदारकी वाचणार का? दहाव्या शेड्यूलनुसार नेमकी अट काय?
TMC च्या बंडखोर खासदारांचा NCPI मध्ये विलीन होण्याचा निर्णय, दहाव्या अनुसूचीनुसार खासदारकी वाचणार की जाणार?
Bhimashankar Temple: भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले, 5 नवीन नियम लागू, एका दिवशी फक्त इतक्याच भक्तांना प्रवेश
भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले, 5 नवीन नियम लागू, एका दिवशी फक्त इतक्याच भक्तांना प्रवेश
Share Market : शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 सेकंदात संपत्ती 8 लाख कोटींनी वाढली, ट्रम्प यांच्या शांतता कराराच्या घोषणेनं अच्छे दिन
शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 सेकंदात संपत्ती 8 लाख कोटींनी वाढली,सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजी
Donald Trump on Strait of Hormuz : होर्मुझची सामुद्रधुनी कधी सुरु होणार? डोनाल्ड ट्रम्प यांनीच दिली अपडेट, शांतता कराराच्या घोषणेनंतर दिवस सांगितला...
अखेर ट्रम्प यांनी टायमिंग साधलं, बड्डेच्या दिवशीच शांतता कराराची घोषणा, होर्मुझची सामुद्रधुनी कधी सुरु होणार?
Share Market : अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज, जपान-दक्षिण कोरियातून गुड न्यूज
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज, जपान-दक्षिण कोरियातून गुड न्यूज
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Ek Hota Malin Marathi Movie: 12 वर्षांखाली गाडलं गेलेलं गाव अन्...; थरकाप उडवणाऱ्या माळीण दुर्घटनेचा थरार मोठ्या पडद्यावर, कधी होणार रिलीज?
12 वर्षांखाली गाडलं गेलेलं गाव अन्...; थरकाप उडवणाऱ्या माळीण दुर्घटनेचा थरार मोठ्या पडद्यावर, कधी होणार रिलीज?
Embed widget