Ajit Pawar vs Sharad Pawar : शरद पवारांचं भाषण सुरु झालं, दादांनी आधी बॅच काढला नंतर मोबाईल चाळला अन् भाषण संपताच तडकाफडकी निघाले; कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
शरद पवारांचं (Sharad Pawar) भाषण संपताच अजित पवार (Ajit Pawar) तडकाफडकी निघून गेले. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात दुरावा कायम असल्याची चर्चा दबक्या आवाजात रंगू लागली आहे.
पुणे : दौंडमधील विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या कार्यक्रमात राजकारण बाजूला ठेवून संपूर्ण पवार कुटुंब एकाच मंचावर होतं. याच कार्यक्रमात शरद पवारांनी (Sharad Pawar) भाषण केलं. शरद पवारांचं (sharad Pawar) भाषण संपताच अजित पवार (Ajit Pawar) तडकाफडकी निघून गेले. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात दुरावा कायम असल्याची चर्चा दबक्या आवाजात रंगू लागली आहे. शरद पवारांचं भाषण सुरु असताना अजित पवारांनी संस्थेने लावलेलं बॅच काढून ठेवलं आणि भाषण संपताच निघाले.
या कार्यक्रमात पवार कुटुंबियांनी अनेक आठवणी आणि किस्से सांगितले. संस्थेमार्फत सुरु असलेल्या कामांचा पाढा वाचला. मात्र एकमेकांवर ताशेरे ओढले नाहीत. राष्ट्रवादीत फुट पडल्यावर पवार कुटुंब पहिल्यांदाच स्वत:च्या संस्थेच्या कार्यक्रमात एकत्र पाहायला मिळालं मात्र या कार्यक्रमात सगळ्यांनी संस्थेचे आणि त्यांचे धोरणं वाचून दाखवले. राजकारण सोडलं तर पवार कुटुंब एकत्रच आहे का?, यांच्यात फक्त राजकीय मतभेद आहेत का?, असे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. त्यात सगळ्यात जास्त लक्ष हे शरद पवार आणि अजित पवारांच्या भाषणाकडे होतं मात्र दोघांनीही फार दोषारोप केल्याचं दिसून आलं नाही.
काकांसमोर अजित पवारांचं भाषण
पवार साहेबांनी शेती क्षेत्रासाठी कृषी विकास प्रतिष्ठान स्थापन केलं आणि शिक्षणाकरिता विद्या प्रतिष्ठानची स्थापना केली. पुणे आणि पुणे जिल्ह्यामध्ये या संस्थेचं मोठं जाळं आहे. इंदापूरमध्येही शाळेची शाखा सुरु झाल्याने इंग्रजी माध्यमाची शाळा आम्ही पवार साहेबांच्या माध्यमातून सुरु केली, असं अजित पवार म्हणाले.
शरद पवार काय म्हणाले?
चांगल्या वास्तूच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आपण एकत्र आलो आहोत. आज नव्या वास्तूचं उद्घाटन होत आहे.1972 ला ही संस्था काढली यातून अनेक विद्यार्थी बाहेर पडले ढाणे मुख्याध्यापकांचा सल्ला घेऊन त्याकाळी या शाळेची उभारणी केली होती, असं सांगत या शाळेतील विद्यार्थी शास्त्रज्ञ झाल्याचा उल्लेखदेखील त्यांनी केला. त्यासोबतच शरद पवारांनी अंनतराव पवारांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. अनंतराव पवारांनी स्वतःचा विचार कमी केला पण आमचा विचार केला. ज्यादिवशी अंनंतराव पवारांचा मृत्यू झाला त्याच क्षणाला सुप्रियाला मुलगा झाला. सुप्रियाचा मुलगा पाहून अनंतरावांची आठवण येते, असंही त्यांनी सांगितलं.
नणंद भावजयांचं फोटोसेशन...
सध्या राज्यात नणंद भावजई म्हणजेच सुनेत्रा पवार आणि सुप्रिया पवार या दोघी चर्चेत आहे. येत्या लोकसभेत एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवण्याच्या चर्चा रंगत आहे. त्यानंतर या कार्यक्रमात नणंद भावजई फोटोसेशन करताना दिसल्या.
इतर महत्वाची बातमी-