Pune Latest Update : पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या गाडीतून रिव्हॉल्वर चोरीला गेली. बनावट चावीने त्यांच्या कारचा दरवाजा उघडून त्यांचे रिव्हॉल्वर चोरून नेले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. बागवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खडक पोलिस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंज पेठेतील लोहियानगर ते भवानी पेठेतील अरुणकुमार वैद्य स्टेडियम या दरम्यान हा प्रकार घडला.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, रमेश बागवे यांनी आपल्या कारच्या ड्रायव्हर शेजारी असणाऱ्या सीटच्या पाठीमागे कप्प्यात ही रिव्हॉल्वर ठेवले होते. हे रिव्हॉल्वर नेमकं कसं चोरी झालं हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. अज्ञात चोरट्याने कारचा दरवाजा उघडून किंवा कारची बनावट चावी तयार करून हे रिव्हॉल्वर चोरून गेले असावे अशी शक्यता आहे. खडक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातमी:
- जळगाव: एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञातांचा हल्ला
- Welcome to India! Intel भारतात करणार सेमीकंडक्टर निर्मिती