पुणे : चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराज आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरुद्ध आता पुण्यातही  गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुण्यातील नातूबागेत 19 डिसेंबरला समस्त हिंदू आघाडीच्यावतीने अफझलखान वधाचा आनंदोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला होता. यावेळी कालीचरण महाराज,  मिलींद एकबोटे  आणि इतरांनी समाजामधे तेढ निर्माण होईल, अशी भाषणे केली.  त्याची व्हिडीओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यावर पोलीसांनी त्याची दखल घेतली आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. 


दाखल करण्यात आलेला गुन्हा अजामीनपात्र असल्याने तपास करुन यातील आरोपींना अटक केली जाईल असं पुणे पोलिसांनी म्हटले आहे. पुण्यातील नातूबागेत 19 डिसेंबरला  समस्त हिंदू आघाडीच्या वतीने अफझलखान वधाचा आनंदोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला होता. यावेळी कालीचरण महाराज,  मिलींद एकबोटे  आणि इतरांनी समाजामधे तेढ निर्माण होईल अशी भाषणे केली.  त्याची व्हिडीओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यावर पोलीसांनी त्याची दखल घेतली आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा गुन्हा नोंद केला.  पुण्यातील खडकमाळ पोलीस ठाण्यात कालीचरण महाराज,  मिलिंद एकबोटे,  नंदकुमार एकबोटे,  मोहन शेटे, भाजपच्या पुण्यातील नगरसेविका मंजुषा नागपुरे यांचे पती दीपक नागपुरे आणि दिगेंद्रकुमार यांच्या विरोधात हा गुन्हा नोंद करण्यात आलाय.  कालीचरण महाराजाने काही दिवसांपूर्वी महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्याच्यावर छत्तीसगडमधे गुन्हा नोंद करण्यात आलाय तर मिलिंद एकबोटेवर कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाबरोबरच इतरही अनेक गुन्हे नोंद आहेत.


नुकत्याच रायपूर इथं झालेल्या धर्मसंसदेत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत अपशब्द वापरले होते. मुस्लिम हे राजकारणाच्या माध्यमातून देशावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या डोळ्यासमोरच त्यांनी 1947 मध्ये देशावर ताबा मिळवला होता. त्यांनी प्रथम इराण, इराक आणि अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. तसेच राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशवरही कब्जा केला आहे. मी नथूराम गोडसे यांना सलाम करतो की त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली. असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले होते. याप्रकरणी त्यांच्याविरोधात काँग्रेससह इतर सामाजिक संघटनांनी रायपूर येथे गुन्हा दाखल केला आहे. तसेच, त्यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्राच्या विधीमंडळात देखील कालीचरण महाराज यांच्या वक्तव्याचे पडसाद पडले होते. त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. अशातच आता 19 डिसेंबरला पुण्यात झालेल्या कार्यक्रमात कालीचरण महाराज आणि मिलिंद एकबोटे यांच्यासह विविध वक्त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केली होती, याप्रकरणी त्यांच्यावर गुन्ह नोंद करण्यात आला आहे.


पुण्यातील 19 डिसेंबरला समस्त हिंदू आघाडीच्यावतीने कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी कालीचरण महाराज, मिलिंद एकबोट यांच्यासह इतर वक्त्यांनी मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीयांबद्दल वादग्रस्त आणि चिथावणीखोर वक्तव्य केली होती. तसेच आक्षेपार्ह हातवारे देखील केले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: