पुणे : सध्या राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय, मात्र, लोकांना याचे गांभीर्य नसल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांनी केले. सुप्रियाचे संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटीव्ह निघाले आहे. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन पवार यांनी केले. आधी स्वत: नियम पाळा आणि मग दुसऱ्याला सांगा. आम्हालाही निर्बंध लावायला चांगले वाटत नाही, परंतू परिस्थिती पाहता निर्बंध लावावे लागतात असेही पवार यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्याच्या राजकारणात यायचं असेल तर जिल्हा बँकेत निवडून येणं गरजेच आहे. मात्र, राज्यातील अनेक जिल्हा बँका रसातळाला गेल्या आहेत. राज्यात बँकांची बिकट परिस्थिती असल्याचेही अजित पवार यावेळी म्हणाले.


पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रचारानिमीत्त आयोजीत केलेल्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. जिल्ह्याच्या राजकारणात यायचं असेल तर जिल्हा बँकेत निवडून येणं गरजेच आहे. मात्र आता बँकेत ठेवी वाढल्या म्हणजे बँक मोठी होत नाही. ज्या बँकेच्या ठेवी 10 हजार कोटींच्या वर असेल तिथे ठेवी ठेवल्या तरी चालतील असे पवार यावेळी म्हणाले. राज्यातील अनेक जिल्हा बँका रसातळाला गेल्यात राज्यात आहेत, बॅकांची बिकट परिस्थिती असल्याचे पवार यावेळी म्हणाले. वेळेत कर्ज फेडले की शून्य टक्के व्याज, अन थकवले की 12 ते 13 टक्के व्याजदर असल्याचे पवार म्हणाले. कुठलीही संस्था उभा करायला अक्कल लागते, ती मोडायला अक्कल लागत नाही. मी परवा सिंधुदुर्गमध्ये असे बोललो तर अजित पवार नारायण राणे यांना बोलले असे दाखवले गेले. पण अस नाही, आता इथं बोललो कोणाला बोललो ? असे पवार यावेळी म्हणाले.


जिल्हा बँक निवडणुकीत काहीजण माझ्याबाबत अफवा पसरवत आहेत. दादा असे म्हटले दादा तसे म्हटले. पण अस काही नसल्याचे पवार म्हमाले.  त्यामुळे अनेकजण भाजपमध्ये गेलेले आहेत. त्यांना त्यांची जागा दाखवायची असल्याचा इशारा अजित पवार यांनी दिला. एखाद्या तालुक्यात गडबड झाली तर सगळं कळणार आहे, त्यामुळे कुठे अडचण येणार नाही. मतदान करून जर कोणाचे काम होत नसेल, तर मी काम करून देईन पण कागदपत्रे असतील तर, नाहीतर बँक काय कोणाच्या बापाची नाही असेही पवार यावेळी म्हणाले. उगीच यामुळे बँका खराब होतात, जाती अन पाहुण्यांचा विचार करू नका, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारसाहेबांनी कधीच जाती पातीचा विचार न करता काम केले आहे. त्यामुळे पॅनल टू पॅनल मतदान करा. प्रलोभने दाखवली जातील, पण मतदान कुठे करायचं हे आपल्या हातात असल्याचे पवार यावेळी म्हणाले.


1 जानेवारीला कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी जाणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तिकडे गर्दी होत असते, त्यामुळे त्या ठिकाणी कायमच्या सगळ्या सुविधा द्याव्यात यासाठी एक समिती केली जाईल, सगळयाना चांगले वाटेल असे काम तिकडे उभे राहील, असेही पवार यांनी सांगितले. स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांचे स्मारक उभे करत आहोत. त्यासाठी पण काम सुरू केलं आहे. तसेच सारथी इमारत लवकरच उभी करतोय. त्याचबरोबर 200 कोटी खर्च करून कृषीभवन उभारणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. कामगार भवन पण उभा करणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.


वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना बूस्टर डोस दिला पाहीजे असाही निर्णय झाला आहे. 18 वर्षांपासून सर्वांनी दोन्ही डोस घेतले पाहिजे. यात राजकारण न आणता काम केलं पाहिजे. हे सर्व जनतेच्या सहभागाशिवाय होणार नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
31 डिसेंबर मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. बाहेर नवीन वर्षाचे स्वागत न करता घरातच नवीन वर्ष स्वागत करा. आम्हाला पण नियम लावू वाटत नाहीत. पण परिस्थितीमुळे नियम लावावे लागतात. काही राज्यात नियम कडक केले आहेत. पण आपल्या राज्यात काळजी घेऊन काम करू असेही पवार यावेळी म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: