बारामती :  अजित पवार (Ajit Pawar) यांचे लहान बंधू श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) पाठिंबा दिला आणि अजित पवारांवर टीका केली. यावेळी त्यांनी नालायक शब्दाचा वापर केला, पण नालायक शब्द अजितदादांसाठी नव्हता, दादांवर बापूंचं प्रेम आहे, दादांना हा शब्द वापरला नाही, असं युगेंद्र पवारांनी (Yugendra Pawar) म्हटलं आहे. याच्यासारखा नालायक माणूस पाहिला नाही, असं वक्तव्य श्रीनिवास पवारांनी (Shrinivas Pawar) केलं होतं. त्यावर आता त्यांचा पुत्र युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 


श्रीनिवास पवारांच्या वक्तव्यावर युगेंद्र पवारांचं स्पष्टीकरण


युगेंद्र पवार यांनी वडील श्रीनिवास पवार यांच्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, बापू कसे आहेत सगळ्यांनाच माहित आहे. बापू सरळ स्पष्ट बोलणारे आहेत, याला मीडियाने वेगळा ट्विस्ट दिला आहे, तसं त्यांना बोलायचं नव्हतं. शेवटी ते भाऊच. भावाचं नातं तुटत नसतं, त्यांनी वेगळी भूमिका घेतली, बापूंच्या विधानाचा वेगळा अर्थ काढला गेला. 


आजीचा वाढदिवसानिमित्त दादा आणि बापू एकत्र आले होते. दादांवर बापूंचं प्रेम आहे, पण राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं. काटेवाडीतील पुढारी लोकांना बापू बोलले आहेत. दादांना बापू कधीच असं बोलणार नाही. हा शब्द वापरला, तो गावातील काही लोकांसाठी वापरला. दादांना हा शब्द वापरला नाही, ते दिलगिरी व्यक्त करतील आणि केली देखील असेल, असं युगेंद्र पवार म्हणाले.


अजित काकांच्या विरोधात पुतण्या युगेंद्र मैदानात


काकांच्या विरोधात पुतण्या मैदानात उतरल्याचं दिसत आहे आजोबा शरद पवारांना साथ देण्यासाठी अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवार मंगळवारी पक्ष कार्यालयात दाखल झाल्याचं पाहायला मिळालं. युगेंद्र पवार यांची आजोबांना साथ मिळताना दिसत आहे. युगेंद्र पवारांचे वडील श्रीनिवास पवार यांनीही शरद पवारांना पाठिंबा जाहिर केला आहे.


सुप्रिया सुळेंच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद


बारामती सुप्रिया सुळे यांचा जोरदार प्रचार सुरु असून याला खूप चांगला प्रतिसाद असल्याचं युगेंद्र पवारांनी सांगितलं आहे. ज्येष्ठ नागरिक, तरुण यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बारामतीकरांचं मत अशा आशयाचं पत्र सध्या व्हायरल होत आहे. यावर उत्तर देताना युगेंद्र पवारल म्हणाले की, पत्र मी पाहिलं नाही. पत्र कोण काढतं कधी येतं, हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. पुढं येऊन बोलावं, चर्चा समोर येऊन करावी. मी कुठं राजकारणामध्ये आहे. राजकीय भूमिका घेतली आहे, वैयक्तिक मतभेद नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Rohit Pawar : 'अख्खं पवार कुटुंब साहेबांसोबत, श्रीनिवास काकांची भूमिका तीच महाराष्ट्राची भावना', रोहित पवारांची प्रतिक्रिया