Rohit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे (Ajit Pawar) सख्खे बंधू श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनी अजित पवारांचा निर्णय पटला नसल्याचे बोलून दाखवले. भाऊ म्हणून तुझे सगळे ऐकले, पण आता नाही असे म्हणत अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी त्यांची साथ सोडली आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


रोहित पवार म्हणाले की, जी भूमिका श्रीनिवास काकांनी मांडली ती भूमिका अख्या महाराष्ट्राची आहे. सामान्य लोकांना कुठेही तुम्ही विचारलं की, काय वाटतं तर त्यांचे हेच मत आहे की, आपल्या काकाला सोडून जाणं हे योग्य नव्हतं आणि तीच भूमिका श्रीनिवास काकांनी दाखवून दिलेली आहे. 


त्यांनी बाजूला होऊन स्वतःला एकटं पाडलंय 


पवार म्हणून आम्ही विचाराबरोबर आहोत आणि विचार जर कोण जपत असेल तर शरद पवार (Sharad Pawar) साहेब आहेत.अख्खं पवार कुटुंब हे विचाराबरोबर, साहेबांबरोबर आहे, असे त्यांनी म्हटले आहे. दादांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे. दादा आणि त्यांचं जवळच जे कुटुंब आहे. त्याच्यामध्ये काकी आणि दोन मुलं आहेत. त्यांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे. त्यांना पवार कुटुंबीयांनी एकटं पाडलं नाही. त्यांनी स्वतः निर्णय घेऊन बाजूला होऊन स्वतःला एकटं पाडलेलं आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


राज ठाकरेंनी भाजपच्या विरोधाचा निर्णय घ्यावा 


मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे-भाजप युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, ते दिल्लीला जाणं. आम्हाला तसं बघितलं तर पटत नाही जे जे दिल्लीला जातात तिथं लोकांचं त्यांच्याबद्दलचं मत फार वेगळं होतं. त्यामुळे लोकं त्याबाबतीत खुश नाहीयेत. त्यामुळे अजून पुढे न जाता त्यांनी त्यांच्या बाबतीतला निर्णय हा महाराष्ट्राचे हिताचा आणि भाजपच्या विरोधाचा घ्यावा अशी विनंती त्यांचे कार्यकर्ते सुद्धा करत आहेत, असे रोहित पवार म्हणालेत. 


एकनाथ खडसेंची लोकसभा निवडणुकीतून माघार, रोहित पवार म्हणाले... 


शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा केली. यावर रोहित पवारांना विचारले असता ते म्हणाले की, माघार घेणं हा एक मुद्दा झाला. पण, डॉक्टरांनी सांगितल्यामुळे माघार घ्यावीच लागली,  आरोग्याचा प्रश्न आहे. कारण शेवटी तेच प्रचार करणार आहेत. मोठे नेते आहेत. ते बऱ्याच ठिकाणी जाऊन राष्ट्रवादीचा आणि आदरणीय पवार साहेबांच्या बाजूला ते प्रचार करणार आहेत. अशातच ते एका मतदारसंघांमध्ये अडकून पडले आणि जर आरोग्याची जर काही अडचण आली तर ते आम्हाला योग्य वाटणार नाही. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या परिस्थितीकडे बघत त्यांनी निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 


आणखी वाचा 


Uddhav Thackeray : महाराष्ट्रात मतं मिळवायला ब्रँड ठाकरेच लागतो! अमित शाह-राज ठाकरेंच्या दिल्लीतील भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी भाजपला डिवचलं