पुणे : बारामती तालुका (Baramati Lok Sabha Election 2024)  कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून युगेंद्र पवार (Yugendra Pawar)  यांना हटवलं. ⁠कुस्तीगीर परिषद (Kustigar Parishad)  सदस्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची  आहे. मात्र  अध्यक्षपदावरून हटवण्याबाबत अधिकृतरित्या कळवण्यात आले नसल्याचा दावा अजित पवारांचा सख्ख्या  पुतण्या युगेंद्र पवारांनी  दावा केला आहे. बारामतीत आत्या सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी युगेंद्र पवार पायाला भिंगरी लावून फिरले होते. बारामतीत सु्प्रिया सुळेंना विजयी करण्यासाठी केलेली कामगिरी पाहता विधानसभेला त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. या विषयी युगेंद्र पवारानी प्रतिक्रिया दिली आहे.  


 विधानसभेला पवार विरुद्ध पवार होईल असं मला वाटत नाही पण वरिष्ठ निर्णय घेतील. मी छोटा कार्यकर्ता आहे. कुणाला उभा करायचं हे ताई, साहेब, जयंत पाटील ठरवतील,असे युगेंद्र पवार म्हणाले. तसेच  सुप्रिया सुळेंच्या विजयावर बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, कार्यकर्त्यांच्या कष्टाला फळ आलं आहे.


एका बाजूने आनंद आणि दुसऱ्या बाजूने दुःख अशी आमची परिस्थिती : युगेंद्र पवार


सुनेत्रा पवारांच्या पराभवावर युगेंद्र पवार म्हणाले, जो उमेदवार पडला आहे त्याचं वाईट वाटतं. शेवटी त्या माझ्या काकी आहेत असं व्हायला नको होतं असं मला सुरुवातीपासून वाटत होतं. एका बाजूने आनंद आणि दुसऱ्या बाजूने दुःख अशी आमची परिस्थिती आहे दोन्ही आपलेच आहेत. आम्ही आमचे कुटुंब समाजकारणात आहे.


⁠कुस्तीगीर परिषदेवरून हटवल्याच्या वृत्तावर युगेंद्र पवार म्हणाले,  माझ्या कानावर काही गोष्टी आल्या पण ऑफिशयल माझ्यापर्यंत काही आलं नाही, या चर्चा आहेत. तीन चार वर्षात चांगले काम केलं. तिथे पैलवानांना चांगली सोय सुविधा दिली. दादांनी पण मदत केली, आता चांगले काम सुरू आहे. ही फक्त चर्चा आहे अजून काही अधिकृत काही नाही.


बारामतीत शरद पवारांचा डंका


बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली होती. सुप्रिया सुळे यांनी तब्बल 1 लाख 58 हजारांच्या मताधिक्याने सुनेत्रा पवार यांना हरवले होते. बारामती लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली होती. यामध्ये बारामती, इंदापूर, खडकवासला आणि बारामती विधानसभाक्षेत्राचा समावेश होता.  


हे ही वाचा :


Bhavana Gawali: कधीकधी सत्य हे कटू असतं, पण ते बोललं पाहिजे, निकालाच्या 48 तासानंतरच भावना गवळींची खदखद बाहेर