यवतमाळ :  कधीकधी सत्य हे कटू असतं, पण ते बोललं पाहिजे. जनतेच्या काही इच्छा पक्षश्रेष्ठींकडून पूर्ण झाल्या नाहीत. यवतमाळ वाशिम लोकसभा  मतदार संघात  महायुतीच्या  उमेदवार  राजश्री पाटील यांच्या  पराभवावर  शिवसेना नेत्या  माजी खासदार भावना गवळी ( Bhavana Gawali )  यांनी विश्लेषण करत  खंत व्यक्त केली. त्या एबीपी माझाशी बोलत होत्या.  खापर फोडून, एकमेकाला दोष देऊन काही निष्पन्न होणार नाही. आता परत एकदा  एकत्र हातामध्ये हात घालून महायुतीला काम करावं लागणार आहे. यवतमाळमध्ये  जनतेने जो कौल  दिलेला आहे.तो मान्य करावा लागेल, असेही त्या म्हणाल्या.  


भावना गवळी म्हणाल्या,  महाराष्ट्रामध्ये  जे काही चित्र  निर्माण झाले किंवा आपण जे रिझल्ट पाहतो त्याच्यातलाच हा एक भाग असू शकतो असे मला वाटतं.  जनतेची जी काही इच्छा होती ती कदाचित पक्षश्रेष्ठींकडून  पूर्ण झाली नाही.  ती मताच्या रूपाने या ठिकाणी जनतेने कदाचित दाखवली असं म्हणायला काही हरकत नाही. कधीकधी सत्य हे कटू असतो पण ते बोललं पाहिजे आणि मला असं वाटतं. या  ठिकाणी ज्या पद्धतीने सर्व सामान्य माणसाच्या जनतेच्या लोकांच्या मनामध्ये मी होते आणि जो विश्वास माझ्यावरती त्यांनी 25 वर्षापासून दाखवला खरोखर मी त्यांची मनातून आभारी आहेच. मात्र   एकनाथ शिंदे  असतील किंवा आमचा पक्ष असेल त्यांच्यावर ते सुद्धा वेगवेगळ्या मार्गांनी प्रेशर हे होतच असं म्हणायला काही हरकत नाही


जेव्हा स्क्रिप्ट लिहिल्या जातात तेव्हा त्या पक्षाच्या हिताच्या नसतात : भावना गवळी


 हेमंत पाटील त्यांनी सुद्धा मान्य केलं होतं की ही स्क्रिप्ट लिहिल्या गेलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला अशा जेव्हा स्क्रिप्ट लिहिल्या जातात तेव्हा त्या पक्षाच्या हिताच्या नसतात. मी एवढंच या निमित्ताने सांगेल की आम्ही शिवसेनेचे काम करते आहे. मी आता ही सक्रिय आहे मी या ठिकाणी शिवसेनेची दोन्ही जिल्ह्यात नाही तर या विदर्भातल्या किमान चार-पाच जिल्ह्यामध्ये सक्षमतेने ही धुरा सांभाळण्याचं काम एक शिवसेनेची नेत्या म्हणून या ठिकाणी  करते आहे, असे भावना गवळी म्हणाल्या. 


स्क्रिप्ट रायटरच्या  मतदार संघात  महायुतीच्या उमेदवाराला लीड कमी मिळाले : भावना गवळी


भावना गवळी म्हणाल्या, स्क्रिप्ट रायटरच्या  मतदार संघात   महायुतीच्या उमेदवाराला  लीड कमी मिळाला  त्याच आत्मचिंतन शिंदे साहेब फडणवीस करतील.  आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे चिंतन करतील. देवेंद्र फडणवीस  सुद्धा चिंतन करतील असा  ठाम विश्वास मला  आहे.  25 वर्षांपासून नाही तीस वर्षांपासून या ठिकाणी शिवसेनेची भक्कमपणाने जबाबदारी सांभाळण्याचं काम या भागाची खासदार म्हणून मी केले आहे .  माझं काम जर चांगला असेल आणि माझ्या कामाची जर निश्चित माझ्या मुख्य नेत्यांनी दखल घेतली त्यामुळे या भागामध्ये चांगले काम मी केले. 


Video :