Kiran Mane Uddhav Thackeray :  सोशल मीडियावर आपल्या राजकीय-सामाजिक भाष्य करणाऱ्या पोस्टने चर्चेत असणारे अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांची सोशल मीडियावरील पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. निवडणूक निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या फोन कॉलचा उल्लेख करत त्यांच्यासोबत झालेले संभाषण शेअर केले आहे. 


लोकसभा  निवडणुकीच्या निकालानंतर सध्या विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. भाजपच्या नेतृत्त्वात केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. सत्ताधारी भाजपच्या धोरणाविरोधात किरण माने  यांनी सातत्याने सोशल मीडियावर लिखाण केले. त्यावरून अनेकदा किरण माने यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. 


उद्धव ठाकरे यांचे दोन मिस कॉल...


किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्टमध्ये म्हटले की, फोन सायलेंटवर होता. सहज हातात घेतला. बघतोय तर पंधरा मिन्टांपुर्वी उद्धवजींचे दोन मिस्ड कॉल्स येऊन पडलेवते ! नंतर 'जय महाराष्ट्र' असा मेसेज येऊन पडला होता. मी काॅलबॅक केला... उद्धवजींनी उचलला. मी काही बोलायच्या आधी त्यांनी बोलायला सुरूवात केली...


"किरणजी, महाराष्ट्रातल्या विजयात तुमचाही वाटा आहे. तुम्ही जे अफाट कष्ट घेतलेत त्याबद्दल आभार. सोबत राहू कायम." उद्धवजी बाळासाहेब ठाकरे माझ्याशी खुप काही बोलत होते... माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू... शिवबंधनाचं सार्थक व्हायला सुरूवात झाली...
भाग गेला सीण केला । अवघा झाला आनंद ।।



दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी मला एका मोठ्या पक्षाकडून तिकिटासाठी विचारणा झाली होती असे किरण माने यांनी सांगितले होते. मी विचाराने विद्रोही असलो तरी द्रोही नाही असेही  किरण माने यांनी एका युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.  या ऑफरची माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सुषमा अंधारे यांना होती असेही किरण माने यांनी या निवडणुकीत म्हटले होते. 


किरण मानेंचा शेलार यांना टोला


लोकसभा निवडणुकीच्या आधी राजकीय नेत्यांकडून अनेक वार प्रतिवार होत होते. त्यातच भाजपचे नेते आशिष शेलार यांनी तर जर महाविकास आघाडीच्या 18 जागा निवडून आल्या तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन असंच म्हटलं होतं. ठाकरे गटाचे उपनेते  आणि अभिनेते किरण माने यांनी आशिष शेलारांचा तो व्हिडिओ शेअर करत टोला लगावला. किरण माने यांनी त्यांचा हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, 'खरा मर्द दिलेला शब्द पाळतो. आशिषजी तुम्ही तो पाळणार याची खात्री आहे.' असे म्हटले. आशिष शेलारांचा हा व्हिडिओ सध्या महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांकडून शेअर करण्यात आला.       


इतर महत्त्वाची बातमी :