Yogesh Sagar and BMC Officer , Mumbai : कांदिवलीच्या चारकोप परिसरात रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने भाजप आमदार योगेश सागर (Yogesh Sagar) यांनी बीएमसी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. बीएमसी अधिकाऱ्यांना (BMC Officer) झापतानाचा योगेश सागर (Yogesh Sagar) यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. कांदिवलीतील रस्त्यांचं काम निकृष्ट दर्जाचं केल्याचा आरोप करत महापालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेताना आमदार योगेश सागर (Yogesh Sagar) एका व्हिडीओत दिसत आहेत. नाला आणि रस्त्याचं काम पूर्ण न झाल्याचं आढळल्यानं सागर यांनी महापालिका अधिकारी (BMC Officer) आणि कंत्राटदाराकडची डायरी नाल्या फेकून दिली. एका अधिकाऱ्याच्या वाढलेल्या दाढीवरुनही आमदार (Yogesh Sagar) महोदयांनी त्या अधिकाऱ्याला सुनावलं. दरम्यान योगेश सागर (Yogesh Sagar) यांच्या या वर्तनावर महापालिका अधिकारी नाराज असल्याचं बोललं जातं.






योगेश सागर काय काय म्हणाले?


BMC, कंत्राटदार आणि मुंबईतील गटारं फक्त पैसा आणि पाणी साठवण्याचे काम करत आहेत, असा आरोप योगेश सागर (Yogesh Sagar) यांनी केला आहे. तु्म्ही काम सुरु करुन एक वर्ष  झालंय. तरिही कनेक्टिव्हिटी झालेली नाही. तुम्हालाही नाल्यामध्ये फेकून देईल. तुम्ही पोलिसांना बोलवा, असंही योगेश सागर (Yogesh Sagar) यांनी म्हटलंय. त्यामुळे बीएमसीचे अधिकारी नाराज झाले असल्याचे बोलले जात आहे. आज हे पूर्ण रोडचे रॅबीट उचलले नाही तर मी बीएमसीमध्ये घुसून आममध्ये कंपाऊडमध्ये घालेन. ज्यांना वारंवार समजावून देखील कळत नाही त्यांच्यासाठी हा एकच उपाय आहे, असंही योगेश सागर यांनी म्हटलंय. दरम्यान, आज योगेश सागर (Yogesh Sagar) यांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला असा आरोप करत  राष्ट्रवादी पक्ष (शरद पवार गटाचे) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात जोडो मारो आंदोलन केले. 







इतर महत्वाच्या बातम्या 


Bhima Sahakari Sakhar Karkhana : खासदाराच्या कारखान्याने उसाचे बिल थकवले, फायनान्सचा तगादा, हतबल शेतकऱ्याने ट्रॅक्टर विहिरीत ढकलला