मुंबई : वंचित आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi)  आतापर्यंत सात उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, महाविकास आघाडीसोबत गणित न जुळल्याने उमेदवारांची मोठी शोधाशोध करावी लागली. अशात, अनेकदा उमेदवार बदलण्याची नामुष्की देखील वंचितवर ओढळल्याचं दिसतंय. दुसऱ्या टप्प्यातील यवतमाळ-वाशिम इथला उमेदवारी अर्ज बाद झाला त्यामुळे दुसऱ्याच उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ वंचितवर आली. नेमके कोणते मतदारसंघ आहेत जिथे उमेदवार बदललेत आणि काय कारणं आहेत? 


 बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून महाविकास आघाडीपासून फारकत घेत पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली.  मात्र काही मतदारसंघात उमेदवार बदलण्याची नामुष्की देखील वंचितवर ओढवल्याचं दिसलं. आतापर्यंत जवळपास 38 मतदारसंघात उमेदवारांची घोषणा वंचितकडून करण्यात आली आहे तर चार ठिकाणी पाठिंबा देण्यात आला आहे. मात्र, उमेदवारांनी घेतलेली माघार आणि बदललेल्या उमेदवारांची संख्या जवळपास दुहेरी संख्येत जात असल्याचं दिसतंय. 


विशाल पाटील यांना देखील  पाठिंब्याची शक्यता


पाठिंब्याबद्दल बोलायचं तर वंचितकडून  चार ठिकाणी पाठिंबा  दिला आहे.   कोल्हापुरातून शाहू महाराजांना तर  नागपुरातून विकास ठाकरेंना पाठिंबा  देण्यात आला आहे.  बारामतीतून सुप्रिया सुळे यांना पाठिंबा  देण्यात आलेला आहे . सांगलीतून प्रकाश शेंडगे लढले तर त्यांना पाठिंबा देण्याचं जाहीर केले गेले होते.  मात्र, प्रतिक पाटील यांनी अकोल्यात आंबेडकरांची भेट घेतली होती .  अशात, विशाल पाटील यांना देखील  पाठिंब्याची शक्यता आहे.


अनिल राठोड यांना उमेदवारी जाहीर 


अमरावतीमधून हो नाही म्हणता  आनंदराज आंबेडकर यांनी अर्ज दाखल केला खरा मात्र… वंचितनं प्राजक्ता पिल्लेवान यांचं तोपर्यंत नाव जाहीर केलं होतं, त्यामुळे ऐनवेळी फॉर्म न भरता वंचितकडून आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देऊ केला आहे. तिकडे, रामटेकमधून देखील शंकर चहांदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, किशोर गजभिये यांना ऐनवेळी पाठिंबा दिल्याने वंचितनं आपला उमेदवार माघारी घेतला. दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या यवतमाळमधून आधी तब्येतीच्या कारणामुळे सुभाष खेमसिंग पवार यांनी माघार घेतल्यानंतर अभिजित राठोड यांनी वंचितकडून अर्ज दाखल केला.  मात्र, अर्जच बाद झाल्याने अपक्ष उभ्या असलेल्या अनिल राठोड यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.


वंचितकडून उमेदवार जाहीर


उत्तर मध्यमधून अबुल खान यांना आधी उत्तर मध्यमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. आता दक्षिण मध्यमधून ते उमेदवार असणार आहेत.  वंचितकडून अजूनही पाचव्या टप्प्यातील 5-6 जागांवर उमेदवार उभे करण्यात आलेले नाहीत. ते काही दिवसात जाहीर होतील.  अशात, ह्या ठिकाणी वंचितकडून उमेदवार जाहीर केले जातात की कोणाला पाठिंबा दिला जातो हे बघणं महत्त्वाचे असेल.  


हे ही वाचा :


Dr Raju Waghmare : निलम गोऱ्हे म्हणाल्या 'उठा आता' अन् पत्रकार परिषदेत झोपलेले राजू वाघमारे खडबडून जागे झाले