Rajnath Singh In Jammu And Kashmir: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी आपल्या दोन दिवसीय जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी महाराजा गुलाब सिंह यांच्या 200 व्या राज्याभिषेक सोहळ्याला हजेरी लावली. कार्यक्रमात आपल्या भाषणात राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर (Pakistan) निशाणा साधत जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार असल्याचे संकेत दिले. ते म्हणाले की, "पीओके आणि गिलगिट-बाल्टिस्तान पाकिस्तानच्या अवैध कब्जात आहेत. विलीनीकरणानंतर जम्मू-काश्मीरला सावत्र वागणूक दिली नसती, तर आज फुटीरतावादी शक्ती इतकी मजबूत झाली नसती. येथे द्वेषाची बीजे पेरण्यात शेजारील देशाची महत्त्वाची भूमिका आहे. कदाचित या वर्षाच्या अखेरीस येथे निवडणूक प्रक्रिया सुरू होईल.''


आज जम्मू-काश्मीरचे संस्थापक महाराजा गुलाब सिंह यांच्या 200 व्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, डॉ जितेंद्र सिंह, डॉ करण सिंह यांच्यासह अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी सर्वांनी जम्मू-काश्मीरबाबत आपली मते मांडली.


2019 पासून परिस्थिती बदलली 


जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा (Manoj Sinha) यांनी यावेळी सांगितले की, गेल्या 70 वर्षांत आपण जम्मू-काश्मीरमध्ये लाचखोरी आणि फुटीरतावादाचे युग पाहिले आहे, परंतु 2019 नंतर जम्मू-काश्मीर प्रगतीच्या मार्गावर आहे. यावेळी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, जम्मू-काश्मीरचे प्रवेशद्वार लखनपूर येथील महाराजा गुलाबसिंग यांच्या पुतळ्याचे आम्ही नुकतेच अनावरण केले. या उद्देशाने जम्मू-काश्मीरमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला येथील संस्थापक राजाची माहिती मिळेल.


इतर महत्वाच्या बातम्या: 


'अग्निपथ' योजनेविरोधी आंदोलनाला हिंसक वळण, बिहारमध्ये उपमुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्षांच्या घरावर हल्ला, आतापर्यंत दोन ठार 
Covid Vaccine for Children : 2 वर्षांवरील मुलांना लवकरच लस? Covaxin सुरक्षित असल्याचा भारत बायोटेकचा दावा
India deals in WTO :164 देशांकडून 'या' करारावर शिक्कामोर्तब, भारतानं केलं नेतृत्व, नऊ वर्षानंतर प्रथमच मोठा करार