Covid Vaccine for Children : लवकरच दोन वर्षांवरील मुलांसाठी कोरोनाची लस उपलब्ध होऊ शकते. या वयाच्या मुलांसाठी कोवॅक्सिन (Covaxin) सुरक्षित असल्याचं परीक्षणामध्ये समोर आले आहे. कोवॅक्सिन (Covaxin) लस तयार करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीने कोवॅक्सिन मुलांसाठी सुरक्षित असल्याचा दावा केलाय. 


हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, कोवॅक्सिन (Covaxin) लस दोन वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी सुरक्षित आहे. कोवॅक्सिन (Covaxin) लस मुलांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करण्यास सफल ठरली. कोवॅक्सिन (Covaxin) लसीच्या परीक्षणाचा अहनाव लँसेट इंफेक्शिअस डिजिजेस पत्रिकांमध्ये प्रकाशित झालाय. भारत बायोटेक कंपनीने पाच लाख लसीचे डोस असल्याचा दावाही केलाय, गरज पडल्यास तात्काळ पुरवण्यात येईल, असे कंपनीने स्पष्ट केलेय. त्यामुळे भविष्यात कोवॅक्सिन (Covaxin) लसीला मंजुरी मिळाल्यास मर्यादीत लसीचा साठा उपलब्ध असेल. 


गतवर्षी परीक्षण - 
भारत बायोटेक कंपनीने गेल्या वर्षी जून 2021 पासून स्पटेंबर 2021 यादरम्यान 2 ते 18 वर्ष वयांच्या मुलांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्यातील परीक्षण केले होते. देशातील विविध केंद्रांवर हे परीक्षण करण्यात आलेय होते. दोन ते 18 वयोगटातील मुलांना लस किती सुरक्षित आहे? रोग प्रतिकारकशक्ती वाढते का? यावर या परीक्षणांमध्ये अभ्यास करण्यात आलाय. या परिणामध्ये लस सुरक्षित असल्याचा निष्कर्ष निघाल्याचा दावा कंपनीने केलाय.  कोवॅक्सिन (Covaxin) लसीचा आरोग्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. तसेच रोग प्रतिकारक शक्ती वाढते, असे परीक्षणातून समोर आल्याचा दावा कंपनीने केलाय. ही माहिती गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गेनाइजेशनला (सीडीएससीओ) पाठवण्यात आली होती. यावेळी कोवॅक्सिन (Covaxin) लसीला 6-18 वर्ष वयाच्या मुलांना आपतकालिन मंजुरी मिळाली होती.  


पाच कोटींपेक्षा जास्त लसीवर आधारीत अभ्यास - 
भारत बायोटेक कंपनीचे चेअरमन आणि एमजी कृष्णा एल्ला म्हणाले की, मुलांसाठी लस सुरक्षित असणे महत्वाचं आहे. कोवॅक्सिन (Covaxin) मुलांसाठी सुरक्षित असल्याचे परीक्षणातून समोर आलेय. आता कोवॅक्सिन (Covaxin) लस लहान आणि मोठ्या मुलांनाही देऊ शकतो.  कोवॅक्सिन (Covaxin) ला युनिव्हर्सल लस तयार करण्याचं लक्ष्य पूर्ण केलेय.    कोवॅक्सिन (Covaxin) लसीचं परीक्षणासाठी पाच कोटींपेक्षा जास्त लसीचा वापर करण्यात आलाय. परीक्षणात कोणतेही गंभीर परिणाम समोर आलेले नाहीत.