Sanjay Raut VS Kirit Somaiya: शौचालय घोटाळ्याबाबत शिवसेना नेते आणि खासदार संजय राउत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर आज निशाना साधला होता. मिरा भाईंदर पालिका क्षेत्रात 2008 साली युवक प्रतिष्ठाणच्या वतीने 16 ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले होते. युवक प्रतिष्ठाणच्या संचालिका मेधा सोमय्या या किरीट सोमय्या यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे राउत यांनी थेट सोमय्या यांच्यावर टॉयलेट घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. 


मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाच्या परवानगीशिवाय मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सीआरझेड, कांदळवन आणि बफर झोन क्षेत्रातील 16 ठिकाणी शौचालय बांधकाम केल्याचा आरोप आहे. याबाबत वनविभाग तपास करत आहेत. 


काय आहे टॉयलेट घोटाळा?


मिरा भाईंदर शहरात एकूण 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यातील 16 शौचालये बांधण्याच कंत्राट किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्रे सादर करून, मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केली. तसेच साढे तीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता.  त्याची दखल घेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करून, अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. त्यामुळे ज्या ठिकाणी शौचालय बांधण्यात आले आहे, त्या जागेची पाहणी वनविभागाने सुरू केली आहे.  महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी ही 18 मार्च 2021 रोजी शासनाला अहवाल सादर केला आहे. त्यामुळे आता मेधा सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


संबंधित बातमी: 


लवकरच किरीट सोमय्यांचा 'टॉयलेट घोटाळा' बाहेर काढणार, संजय राऊतांचा इशारा


Sanjay Raut : 'महाराष्ट्रात जामिनाचा घोटाळा सुरु, सोमय्यांना तुरुंगात जावंच लागणार'; राऊतांचा पलटवार


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha