Vinayak Raut on Narayan Rane : मी कोकणचा कॅलिफोर्निया करणार असं वक्तव्य महायुतीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले होते. नारायण राणेंच्या वक्तव्याचा ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी चांगलाच समाचार घेतलाय. "1999  सालापासून नारायण राणे कोकणचा कॅलिफोर्निया करेन असं बोलत आलेले आहेत. या उलट कोकणाला भकास करण्याचं काम नारायण राणे यांनी केलं आहे. कोकणचा कॅलिफोर्निया करायचं सोडाच प्रकल्पाच्या नावाने जिल्ह्यातील भूमी हडप करण्याचं काम जे नारायण राणे यांनी केलं आहे. ती भूमी जरी मोकळी करून दिलात तरी भरपूर काही केल्यासारखं होईल, तर ज्या माणसाला स्वतःच्या मंत्रिमंडळाचा अर्थ कळला नाही. ते कॅलिफोर्निया काय करणार?" अशी टीका खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी नारायण राणे यांच्यावर केली आहे. 


कोकणच्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न केला जातोय


विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले, गृहमंत्री अमित शहा यांनी पडणाऱ्या उमेदवारासाठी सभा घेणे योग्य नाही. उद्धवजींच्या काळात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळालेली थेट कर्जमाफी, नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मिळवून दिलेली आर्थिक मदत याबाबत देवेंद्र फडणवीसांना विसर पडला आहे. उद्धवजींनी आपल्या काळात सिंधुदुर्गासह महाराष्ट्रात पाच वैद्यकीय शासकीय महाविद्यालये मंजूर केली. तर नारायण राणे यांनी स्वतःच वैद्यकीय महाविद्यालय आणलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॅथ लॅब  सोलापूरला हलवली तर कोकणच्या जमिनी हडप करण्याचा जो प्रयत्न केला जातोय, यावर देवेंद्र फडणवीस का बोलले नाहीत असा प्रश्न खासदार विनायक राऊत यांनी विचारला आहे. 


मोदींना मत महागाईला मत, मोदींना मत म्हणजे बेरोजगारीला मत


मोदींना मत महागाईला मत, मोदींना मत म्हणजे बेरोजगारीला मत, मोदीला मत म्हणजे हुकूमशाहीला मत, मोदींना मत म्हणजे देशाची फाळणी करायला निघालेल्या दुसऱ्या हुकमी राजवटीला मत आहे. आता लोकांना कळून चुकले आहे. माझ्या प्रचाराचा तिसरा व शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. दहा ते दोन असा माझा प्रचार सुरू आहे. रखरखत्या उन्हाची परवा न करता मी फिरतो आहे. तर येणाऱ्या काही दिवसात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सभा होणार आहेत. रत्नागिरीकरांनी सुद्धा ही खुनशी ब्यात वेशी बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे,अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी दिली. 


इतर महत्वाच्या बातम्या 


संजय मंडलिकांना दिलेलं मत मला मिळणार, मोदींनी कोल्हापूरची निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांवर न्यायचा प्रयत्न कसा केला? जाणून घ्या