कोल्हापूर : हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शनिवारी तपोवन येथे सभा घेतली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापुरवासियांना संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांना मतदान करण्याचे आवाहन केले. तुम्ही संजय मंडलिक यांना दिलेले मतदान हे थेट मला दिलेले मत असेल, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. त्यासोबतच पंतप्रधान मोदी यांनी कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीत स्थानिक गोष्टींपेक्षा राष्ट्रीय मुद्दे  कशाप्रकारे चर्चेत राहतील, यादृष्टीने आपल्या भाषणाची मांडणी केली. 


संपत्तीचा अर्धा हिस्सा कराच्या रुपाने सरकारी तिजोरीत जमा केला जाईल


कोल्हापुरातील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास कशाप्रकारे हिंदूंची संपत्ती हिसकावून घेतली जाईल, हे सांगितले. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास तुमच्या घरातील महिलांच्या दागिन्यांची आणि सोन्याची तपासणी केली जाईल. तुमची संपत्ती काँग्रेसच्या मते ज्यांचा या देशाच्या संपत्तीवर पहिला हक्क आहे, त्यांना दिली जाईल. तसेच तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीचा अर्धा हिस्सा कराच्या रुपाने सरकारी तिजोरीत जमा केला जाईल, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. 


काँग्रेस सत्तेत आल्यास आरक्षणाचं कर्नाटक मॉडेलची अंमलबजावणी केली जाईल : मोदी


कोल्हापूर येथील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी एक नवा मुद्दा प्रचारात आणला. मोदींनी सांगितले की, देशात काँग्रेसची सत्ता आल्यास देशभरात आरक्षणाच्या कर्नाटक मॉडेलची अंमलबजावणी केली जाईल. कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने ओबीसी कोट्यातील २७ टक्के आरक्षण रातोरात कागदपत्रांवर शिक्के मारुन मुस्लिमांना देऊन टाकले. त्यामुळे एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी कोट्यातील २७ टक्के आरक्षण लागू झाले. त्यांनी ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्णपणे लुटले. २०१२ मध्ये काँग्रेस सरकारने हा प्रयत्न केला होता, पण तो अयशस्वी ठरला. आता काँग्रेसला संविधान बदलून दलित आणि मागासांचं आरक्षण मुस्लिमांना द्यायचे आहे. काँग्रेस नव्याने हा प्रयत्न करणार असेल तर तुम्ही हे खपवून घेणार का, असा सवाल मोदींनी उपस्थित केला.


कोल्हपुरात शाहू महाराज वि. संजय मंडलिक 


कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने शाहू महाराजांना उमेदवारी दिली आहे, तर शिंदे गटाने विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवलं आहे. त्यातच भाजपने ही निवडणूक स्थानिक नाही तर राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Madha Loksabha : माढ्यात देवेंद्र फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक, धवलसिंह मोहिते पाटलांना गळाला लावलं, अकलूजमध्ये काँग्रेसला खिंडार