Ujjwal Nikam : मुंबई : देशाला हादरवून टाकणारा मुंबई 1993 बॉम्ब हल्ला असेल, बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) असेल, कोपर्डी (Kopardi) हत्याकांड असेल किंवा 26/11 मुंबई हल्ला असेल, देशात गाजलेल्या ह्या घटनांचे विशेष सरकारी वकिल म्हणून ज्यांनी काम केलं. या खटल्यांच्या माध्यमातून आरोपींना शिक्षा मिळवून देत न्यायालयात सरकारची भक्कमपणे बाजू मांडणारे प्रख्यात व निष्णात वकील म्हणजे उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam). उज्ज्वल निकम हे मूळचे उत्तर-महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील. जळगावातील उच्च-शिक्षित कुटंबातून ते येतात. आपले बीएससी आणि एलएलबीपर्यंतचे शिक्षण त्यांनी जळगावातच पूर्ण केलं. त्यानंतर, सरकारी वकिल म्हणू शासकीय सेवेत दाखल झाले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी देशातील मोठ-मोठ्या खटल्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यामुळेच, राज्यात आणि देशात त्यांची नामांकीत विशेष सरकारी वकील म्हणून आजही आहे.


उज्ज्वल निकम यांनी प्रख्यात वकील आणि अनेक मोठ्या खटल्यांत सरकारचे वकील म्हणून तीन दशकांहून अधिक काळ काम पाहिले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच ते सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्याच्या राजकीय प्रवेशाच चर्चा रंगली होती. शरद पवार यांच्यासमवेत अनेकदा कार्यक्रमात ते दिसून आले. त्यामुळे, महाविकास आघाडीचं सरकार असताना ते राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा होती. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही त्यांनी 2021 मध्ये भेट घेतली होती, त्यामुळे ते शिवसेनेत जातील अशी चर्चा रंगली. मात्र, उज्जल निकम यांना उत्तर-मध्य मुंबईतून भाजपाने उमेदवारी जाहीर करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. दरम्यान, 2016 मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने उज्ज्वल निकम यांचा गौरव करण्यात आला आहे.


जळगाव ते मुंबई


एलएलबी पदवीनंतर जळगाव जिल्हा न्यायालयात उज्जल निकम यांनी वकील म्हणून कारकिर्द सुरू केली. पुढे, याच कोर्टात सरकारी वकील म्हणून त्यांनी काम केले. सर्वप्रथम अंबरनाथमधील बॉम्बस्फोट खटला त्यांनी हाताळला होता. या अनुभवाचा फायदा त्यांना 1993 मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात झाला. सरकारी वकील म्हणून त्यांच्या कारकिर्दिला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली ती 1993 मुंबई बॉम्बस्फोट खटल्यामुळे. 13 मार्च 1993 ला, मुंबई साखळी बॉम्बस्फोटाने हादरली. बॉम्बब्लास्टशी संबंधित अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या 100 पेक्षा जास्त सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. याच प्रकरणात अभिनेता संजय दत्त यास शिक्षा मिळवून देण्यात उज्जल निकम यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. निकम यांनी पहिल्यांना महाराष्ट्र सरकारचे आणि त्यानंतर सीबीआयचे वकील म्हणूनही काम केलं होतं.


पद्मश्रीसह विविध पुरस्कारने सन्मानित


2016 मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने उज्ज्वल निकम यांचा गौरव करण्यात आला आहे.
2011 मध्ये राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुणे विद्यापीठाची मानद डॉक्टरेट
2009 मध्ये राष्ट्रपती प्रतिभा पाटीलच्या हस्ते साताऱ्यातील स्वातंत्र्यसैनिक उंधाळकर पुरस्कार
महाराष्ट्र टाइम्सकडून 'स्टेट आयडॉल'पुरस्काराने गौरव
स्टार माझा वाहिनीकडून बेस्ट ऍडवोकेट पुरस्काराने गौरव
डीएनए दैनिकाकडून महाराष्ट्र रत्न पुरस्काराने गौरव
नागपूरकरांकडून दक्ष नागरिक म्हणून गौरव
महाराष्ट्र टाइम्सकडून टॉप मराठी अचिव्हर पुरस्काराने गौरव
औरंगाबामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर भीमरत्न पुरस्काराने गौरव


सरकारी वकील म्हणून लढलेले खटले 


1991 कल्याण रेल्वे बाँबस्फोट खटला
1993 मुंबई साखळी बाँबस्फोट खटला
1994 पुण्यातले राठी हत्याकांड
2003 गेट वे ऑफ इंडिया व झवेरी बाजार बाँबस्फोट खटला
२००३ गुलशन कुमार खून प्रकरण
2004 नदीमच्या हस्तांतरणाचा लंडनमधला खटला
2006 खैरलांजी दलित हत्याकांडाचा खटला
२००६ गँगस्टर अबु सालेम प्रकरण
2006 प्रमोद महाजन हत्या प्रकरण
२००८ मुंबईवरचा दहशतवादी हल्ला
2010 कोल्हापुरातले साखळी बाल हत्याकांड
2010 शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण
2016 डेव्हिड हेडली खटला


ठळक सादरीकरण 


संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत दहशतवाद्यांविरुद्धच्या परिसंवादात भारताचे प्रतिनिधीत्व करुन सादरीकरण - 2010
हेगमधल्या दहशतवादाविरुद्धच्या लढ्याचे जागतिक केंद्रात सादरीकरण - 2012
मुंबईवरील हल्ल्याच्या पाकिस्तानातल्या खटल्याच्या आढाव्यासाठी गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे सदस्य


हेही वाचा


मोठी बातमी : उज्ज्वल निकम यांना भाजपचं तिकीट, उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी!