नागपूर : पंतप्रधान मोदी (PM Modi) पाताळयंत्री असून आहे, खोटं बोलतात, अशा शब्दात काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार (Vilas Muttemwar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. चारशे पार असे इतरांचे पक्ष फोडून आणि लोकांच्या घरी डाका टाकून होणार का? असा प्रश्न देखील मुत्तेमवार यांनी उपस्थित केला आहे. विलास मुत्तेमवार यांनी नागपुरात (Nagpur) चंद्रमणी नगर येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत हे वक्तव्य केलं आहे. 


मोदी पाताळयंत्री, मोदींनी देशाचे वाटोळं केलं


मोदी भोपाळमध्ये त्यांच्या सभेत म्हणाले की, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता ज्याने 70 हजार कोटींचा घोटाळा केला, त्याला मी सोडणार नाही आणि चार दिवसांनी त्याच अजित पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या बाजूला बसवले, ही कसली पार्टी विथ डिफ्रेंस. मोदी म्हणतात, अबकी बार चारशे पार. मात्र, चारशे पार असे इतरांचे पक्ष फोडून आणि लोकांच्या घरी डाका टाकून होणार का? असा सवाल ही मुत्तेमवार यांनी विचारला आहे. मोदींनी देशाचे वाटोळं केलं असून या माणसाला आता थांबवलेच पाहिजे, असं आवाहन मुत्तेमवारांनी मतदारांना केलं आहे. 


मुत्तेमवार यांचा भाजप कार्यकर्त्यांना सज्जड दम


दरम्यान, अबकी बार 400 पार, हा काय बापाचा माल आहे का, असं वक्तव्य विलास मुत्तेमवार यांनी केलं होतं, यानंतर भाजपकडून त्यांच्या विरोधात आंदोलनं करण्यात आलं आहेत. आमच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांना ही आम्ही पाहून घेऊ. जर असे वारंवार होणार असेल, तर उद्या आम्हीही गडकरी यांच्या सभा होऊ देणार नाही. मोदींच्या विरोधातील वक्तव्यानंतर घराजवळ आंदोलन करून जाळपोळ करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना विलास मुत्तेमवार यांनी सज्जड दम भरला आहे.


आम्ही संयम पाळला, नाहीतर...


निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ही भाजप कार्यकर्त्यांनी माझ्या घराजवळ आंदोलन केले, घोषणाबाजी करत जाळपोळ केली आणि हे सगळं होत असताना पोलीस बघ्याची भूमिका घेऊन सर्व पाहत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी केला आहे. आम्ही संयम पाळला, जर आमचेही 400 लोक आले असते, तर काय झालं असतं, असा सवाल ही मुत्तेमवार यांनी विचारला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Sanjay Raut : महाराष्ट्राच्या राजकारणात साडेतीन शहाणे, त्यांना आव्हान देण्यासाठी आजचा मुहूर्त; संजय राऊतांना घणाघात