Vijay Wadettiwar on Kailas Gorantyal : "आमदार कैलास गोरंट्याल यांनी क्रॉस वोटिंग केल्याच्या बातम्या येत आहे. पण हे वृत्त पूर्ण चुकीचे आहे. आमदार कैलास गोरंट्याल हे पक्षनिष्ठ आहेत, त्यांच्याबाबतचे वृत्त खोडसाळपणाचे आहे", अशी भूमिका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली आहे. विजय वडेट्टीवार यांनी कैलास गोरंट्याल यांच्याबाबत एक ट्वीट केलं आहे. 






विजय वडेट्टीवार यांचे ट्वीट जसेच्या तसे ... 


लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले, महाराष्ट्रातील जनता आमच्या बरोबर आहे.पण जनतेने निवडून दिलेल्या काही आमदारांनी पक्षाशी बेइमानी केली आहे.


पक्षातील बेईमान आम्हाला शोधून काढायचे होते म्हणूनच काँग्रेसने विधानपरिषद निवडणूक लढवली होती. आता पक्षातील कचरा साफ होईल.


कालच्या निकालानंतर घरचे भेदी शोधण्यात आम्हाला यश आले आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींना संपूर्ण अहवाल देण्यात आला आहे, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल.


आमदार कैलास गोरंट्याल यांनी क्रॉस वोटिंग केल्याच्या बातम्या येत आहे. पण हे वृत्त पूर्ण चुकीचे आहे.आमदार कैलास गोरंट्याल हे पक्षनिष्ठ आहेत, त्यांच्याबाबतचे वृत्त खोडसाळपणाचे आहे!


विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवार विजयी झाले


विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारलीये. महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवार विजयी झाले. यामध्ये भाजपच्या 5, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 2 उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली. मात्र, या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. कारण काँग्रेसची ८ मतं फुटली. शिवाय ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना महायुतीतील पक्षांची मतं फोडण्यात अपयश आले होते.


काँग्रेसकडून आमदारांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न नाही


विधानपरिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर आपल्या आमदारांची मतं फुटू नयेत, यासाठी प्रत्येक पक्ष काळजी घेत होता. अजित पवारांची राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष, शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आणि काँग्रेसने आपले आमदार हॉटेलमध्ये ठेवले नव्हते. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Eknath Shinde on Narendra Modi : नरेंद्र मोदी हॅटट्रीक करणारे पंतप्रधान, काहींनी पराभव झाल्याचे पेढे वाटले, एकनाथ शिंदेंचा मविआला टोला