Eknath Shinde on Narendra Modi, Mumbai : "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तन मन आणि कामात राम आहे. मोदी जेव्हा राज्यात येतात तेव्हा आनंद घेऊन येतात आणि विकास देखील हॅटट्रिक करणारे पंतप्रधान आहेत. लोकसभा निवडणुकीत देशात एकच नाव होते पंतप्रधान मोदी यांचे पण काहींनी खोटे नरेटीव्ह पसरवले. काहींनी तिसऱ्यांदा पराभव झाल्याचे पेढे वाटले", असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. राजधानी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळा बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. या उद्घाटन समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
मोदींच्या हस्ते 29 हजार कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की, सलग तीन वेळा पंतप्रधान झालेले मोदी आज पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आले. मोदींच्या हस्ते 29 हजार कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे. अटल सेतू, कोस्टल रोड, नवी मुंबई एअर पोर्ट असो आपल्या काळात झाला. आपल्याच हस्ते अंडरग्राउंड मेट्रोचे उद्घाटन होत आहे. आपण आम्हाला विविध प्रकल्प दिलेले आहेत.
मोदींना आज देशाचे विकास पुरुष म्हटले जात आहे
अजित पवार म्हणाले, मोदींना आज देशाचे विकास पुरुष म्हटले जात आहे. मुंबईत आज विकासाची कामे होते आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसचे लोकार्पण होत आहे. मोदींच्या नेतृत्वात लोक हिताला प्राधान्य दिलं जाईल. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा पहिला दौरा आहे. 29 हजार कोटींचे प्रकल्प होत आहेत. राज्य सरकारने १० लाख विद्यार्थी यांच्या साठी चांगला निर्णय घेतला.
इतर महत्वाच्या बातम्या