Vidarbha Minister In Mayauti Government : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या लँडस्लाईड यशानंतर महायुती सरकारमधी मंत्र्यांचा शपथविधी आज (15 डिसेंबर) नागपुरात पार पाडणार आहे. यामध्ये 19 मंत्री भाजपकडून मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून 11 जण मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सात जण मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी मंत्रीपदांमध्ये मोठा फेरबदल करण्यात आला असून तब्बल 19 चेहरे मंत्रीपदामध्ये नवीन चेहरे असणार आहेत. त्यामुळे एक प्रकारे महायुतीमध्ये मंत्रीपदामध्ये भाकरी फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे.
मंत्रीमंडळात विदर्भ आणि मराठवाड्याचे वर्चस्व
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळात यंदा विदर्भ आणि मराठवाड्याचे वर्चस्व बघायला मिळाले आहे. पश्चिम महाराष्ट्राचे 10 तर विदर्भाचे 9 मंत्र्यांची मंत्रीपदासाठी वर्णी लागली आहे. मात्र विदर्भातील 7 जिल्ह्याची पाटी कोरी असल्याचे चित्र आहे. सोबतच मराठवाड्याच्या वाट्याला 4 मंत्रीपद आले आहे. मात्र मराठवाड्यातील नांदेड, धाराशिव,जालना, हिंगोलीची पाटी कोरी राहिली असल्याचे चित्र आहे. महायुतीत आता पर्यंत एकूण 36 जणांना मंत्रिपदासाठी फोन गेला असून यामध्ये तब्बल 10 मंत्री पश्चिम महाराष्ट्रातून आहेत. अजित पवार यांच्या रुपाने उपमुख्यमंत्रीपद सुद्धा आहे.
विदर्भातील 7 जिल्ह्याची पाटी कोरी
समोर आलेल्या माहितीनुसार, फडणवीसांच्या मंत्रीमंडळात 16 जिल्ह्याची पाटी कोरी आहे. तर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचे वर्चस्व पहायला मिळाले आहे. कोकणातील 3 जिल्ह्यांना मंत्रीमंडळात स्थान आहे. मात्र मराठवाड्यातील नांदेड, धाराशिव,जालना, हिंगोलीची पाटी कोरी राहिली आहे. तर विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती आणि वाशिम या 7 जिल्ह्याची पाटी कोरी असल्याचे चित्र आहे.
भाजपकडून कोणाला मंत्रिपदासाठी संधी- (BJP Cabinet Minister List)
1. नितेश राणे
2. शिवेंद्रराजे भोसले
3. चंद्रकांत पाटील
4. पंकज भोयर
5. मंगलप्रभात लोढा
6. गिरीश महाजन
7. जयकुमार रावल
8. पंकजा मुंडे
9. राधाकृष्ण विखे पाटील
10. गणेश नाईक
11. मेघना बोर्डीकर
12. अतुल सावे
13. जयकुमार गोरे
14. माधुरी मिसाळ
15. चंद्रशेखर बावनकुळे
16. संजय सावकारे
17. अशोक उईके
18. आकाश फुंडकर
19. आशिष शेलार
शिवसेनेकडून कोणाला मंत्रिपदासाठी संधी- (Shivsena Cabinet Minister List)
1. उदय सांमत
2. प्रताप सरनाईक
3. शंभूराज देसाई
4. योगश कदम
5. आशिष जैस्वाल
6. भरत गोगावले
7. प्रकाश आबिटकर
8. दादा भूसे
9. गुलाबराव पाटील
10. संजय राठोड
11. संजय शिरसाट
राष्ट्रवादीकडून कोणाला मंत्रिपदासाठी संधी- (NCP Cabinet Minister List)
1. आदिती तटकरे
2. बाबासाहेब पाटील
3. दत्तमामा भरणे
4. हसन मुश्रीफ
5. नरहरी झिरवाळ
6. मकरंद पाटील
7. इंद्रनील नाईक
8. धनंजय मुंडे
9. माणिकराव कोकाटे
हे ही वाचा