Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 च्या (Lok Sabha Election 2024)तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. देशात 7 टप्प्यात, तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे पर्यंत पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. सोबतच संपूर्ण लोकसभा निवडणूकांचा महानिकाल 4 जून रोजी असेल. यात प्रामुख्याने दुसऱ्या टप्प्यात अकोला पश्चिम विधानसभा(Akola Lok Sabha Constituency) मतदारसंघासाठी पोटनिवडणुक होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.


भाजप आमदार गोवर्धन शर्मा (Gowardhan Sharma) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अकोला पश्चिम मतदारसंघात येत्या 26 एप्रिलला पोटनिवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाचे  (Election Commission of India) मुख्य आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) आणि आयुक्त सुखविंदर  संधू (Sukhbir Singh Sandhu ), ज्ञानेश कुमार (Shri Gyanesh Kumar ) यांनी केलीय.


दुसऱ्या टप्प्यात पोटनिवडणुकीची घोषणा


अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार आणि माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांच्या विजयाने तब्बल 29 वर्षांनंतर सत्ता मिळवण्यात यश आले होते. मात्र 4 नोव्हेंबर 2023 रोजी गोवर्धन शर्मा यांनी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाल्याने भाजपची मोठी राजकीय हानी झाली. त्यांच्या निधनाने हा मतदारसंघ रिक्त होता. तर त्यावेळी राज्यात विधानसभा निवडणुकीला एक वर्षांपेक्षाही कमी कालावधी असल्याने पोटनिवडणूक होणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला होता. तर अनेक राजकीय पक्षानी संभाव्य पोटनिवडणुकीची शक्यता लक्षात घेता या मतदारसंघातून लढण्याची तयारी देखील सुरू केली होती. अखेर आज केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त सुखविंदर  संधू , ज्ञानेश कुमार यांनी अकोला पश्चिम मतदारसंघात येत्या 26 एप्रिलला पोटनिवडणुक घेण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. 


कोण होते आमदार गोवर्धन शर्मा ? 


गोवर्धन शर्मा यांचा जन्म 2 जानेवारी 1949 रोजी यवतमाळमधील पुसद तालुक्यात झाला. त्यांनी अकोल येथील एलआरटी वाणिज्य महाविद्यालयातून बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केले. 1985 ते 1995 पर्यंत अकोला नगरपालिकेत डाबकीरोड भागातून नगरसेवक म्हणून ते विजयी झाले. 1995 मध्ये पहिल्यांदा अकोला विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर त्यांचा विजय झाला. जून 1995 ते 7 मे 1998 या कालावधीत युती सरकारमध्ये मनोहर जोशी यांच्या मंत्रीमंडळात पशु, मत्स्य संवर्धन आणि दुग्धविकास खात्याचे ते राज्यमंत्री होते. अकोला आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. 


1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 असं सलग सहा वेळा अकोल्यातून ते भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आलेत. अकोला जिल्ह्यात आणि भाजपच्या वर्तुळात 'लालाजी' नावाने लोकप्रिय होते.  अतिशय साधं राहणीमान आणि लोकांना सहज उपलब्ध असलेला नेता अशी त्यांची ओळख होती. लोकांशी थेट जनसंपर्क असल्याने सलग सहावेळा ते निवडणुकीच्या रिंगणात विजयी झाले होते. दरम्यान त्यांनी कधीही चारचाकी किंवा फोनही वापरला नाही. त्यांच्या या राहणीमानाचं विशेष कौतुक केलं जायचं. 


संबंधित बातम्या