Lok Sabha Election 2024 Date LIVE Updates : लोकसभा निवडणूकांच्या तारखा (Lok Sabha Election 2024 Date) जाहीर करण्यात आल्या आहेत. देशात सात टप्प्यात निवडणुका घेण्यात येणार आहेत. 19 एप्रिल ते 1 जून या दरम्यान लोकसभा निवडणूका पार पडणार आहेत. निवडणूक आयुक्तांनी शनिवारी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली आहे. यामुळे आता निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. देशातील सात टप्प्यांतील मतदानापैकी महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार असून राज्यात पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. देशात 19 एप्रिल ते 1 जून असे 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे पर्यंत पाच टप्प्यात पार पडणार आहे. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे मे या पाच टप्प्यात मतदान होणार आहे.


लोकसभा निवडणुकीच्या तारखा 2024


मतमोजणी : 4 जून 2024


देशात सात टप्प्यात मतदान



  • टप्पा 1 : 19 एप्रिल 2024

  • टप्पा 2 : 26 एप्रिल 2024

  • टप्पा 3 : 7 मे 2024

  • टप्पा 4 : 13 मे 2024

  • टप्पा 5 : 20 मे 2024

  • टप्पा 6 : 25 मे 2024

  • टप्पा 7 : 1 जून 2024


महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान


महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या दरम्यान लोकसभ निवडणुका पार पडणार आहेत. तुमच्या भागात मतदान कधी होणार, हे जाणून घ्या.


पहिला टप्पा : 19 एप्रिल 2024


महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार असून यावेळी पाच मतदारसंघात मतदान होणार आहे. 19 एप्रिलला विदर्भातील सहा मतदार संघात मतदान पार पडणार आहे. रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर 19 एप्रिलला


दुसरा टप्पा : 26 एप्रिल 2024


राज्यात 26 एप्रिल 8 मतदारसंघात मतदान होणार असून यावेळी वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, बुलढाणा या मतदारसंघात मतदान होईल.


तिसरा टप्पा : 7 मे 2024


राज्यात 7 मे रोजी 11 मतदारसंघात मतदान होणार आहे. रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघात 7 मेला मतदान होईल.


चौथा टप्पा : 13 मे 2024


राज्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 मतदारसंघात 13 मेला मतदान पार पडेल.


पाचवा टप्पा : 20 मे 2024


महाराष्ट्रातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मेला होईल. धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघात 20 मे रोजी एकूण 13 मतदारसंघात मतदान पार पडेल.


पाहा व्हिडीओ : महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार, निवडणूक आयोगाची घोषणा



महत्त्वाच्या इतर बातम्या :


Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या रणधुमाळीला सुरुवात! 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीला सुरुवात; मतदानाचं संपूर्ण वेळापत्रक पाहा एका क्लिकवर...