Parliament Monsoon Session 2022: राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा सोमवारी शेवटचा दिवस होता. नायडू यांना निरोप देताना आपल्या भाषणात आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी नायडू यांचे पहिले अध्यक्ष म्हणून वर्णन करताना म्हटले की, पहिले प्रेम जसे लक्षात ठेवले जाते, तसे तुम्ही मला पहिले अध्यक्ष म्हणून लक्षात राहाल. यावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राघव चढ्ढा यांना विचारले की, राघव! मला वाटतं प्रेम पहिल्यांदाच होतं ना? हे दुसऱ्या किंवा तिसऱ्यांदा होत नाही.
नायडू असं म्हणाल्यानंतर राघव चढ्ढा आपल्या जागेवर उभे राहिले आणि म्हणाले की सर, मी अजून इतका अनुभवी नाही सर, मला आयुष्यात इतके अनुभव आले नाहीत. पण सर छान आहे. तेव्हा उपराष्ट्रपती पुन्हा हसले आणि म्हणाले की हो! पहिलं प्रेम चांगलं असतं, तेच प्रेम आयुष्यभर टिकावं.
जगदीप धनखड 11 ऑगस्टला उपराष्ट्रपती म्हणून घेणार शपथ
जगदीप धनखड 11 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. मोहरम आणि रक्षाबंधनामुळे मंगळवार आणि गुरुवारी सभागृहाची बैठक होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी जीएमसी बालयोगी सभागृहात सभागृहातील सर्व सदस्यांकडून नायडू यांच्यासाठी आणखी एक निरोप समारंभ आयोजित केला जाणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नायडू यांना स्मृतीचिन्ह अर्पण करतील, तर राज्यसभेचे उपसभापती निरोप देतील.
दरम्यान, व्यंकय्या नायडू यांच्या निरोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले आणि त्यांच्यात अनेक गुण असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा ते पक्ष संघटनेसाठी काम करायचे. अटलजींचे सरकार स्थापन झाले. मंत्रिमंडळाची स्थापना होत होती. संघटनेच्या कामामुळे व्यंकय्या नायडू यांच्याशी अधिक संवाद होता. मोदी म्हणाले, आज सभागृहात काय होणार आहे, हे त्यांना माहीत असायचे. सभागृहाचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, ते असे व्यक्ती आहेत, ज्यांना सभागृहाची सर्वात जास्त काळजी होती.
इतर महत्वाच्या बातम्या:
संसदेत 'वंदे मातरम' गाण्याचा पहिला मान, स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री, जाणून घ्या कोण होत्या सुचेता कृपलानी
50 वर्षांपूर्वी चोरीला गेलेली पार्वती देवीची मूर्ती न्यूयॉर्कमध्ये सापडली, तामिळनाडूतून झाली होती चोरी