Sucheta kriplani : भारताच्या राजकारणात आज महिलांची भूमिका आणि सहभाग वाढत आहे. सध्या देशाच्या सर्वोच्च पदावर, म्हणजे राष्ट्रपतीपदावर एक राष्ट्रपती महिला आहेत. अर्थमंत्री एक महिला आहेत. देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल एक महिला आहेत, ज्या यापूर्वी गुजरातच्या मुख्यमंत्री होत्या. बंगालच्या मुख्यमंत्री एक महिला आहेत. शिवाय उत्तर प्रदेशातील प्रमुख राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा एक महिला आहे. एकूणच भारताच्या राजकारणात महिला प्रत्येक प्रमुख पदावर विराजमान आहेत. सुचेता कृपलानी यांना देशात पहिल्यांदा एक महिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाल.


कोण होत्या सुचेता कृपलानी?


सुचेता कृपलानी या स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. एवढेच नाही तर सुचेता या प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक होत्या. सुचेता कृपलानी यांचा जन्म 25 जून 1908 रोजी हरियाणातील अंबाला येथे एका बंगाली कुटुंबात झाला. त्या एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी होत्या. उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून कृपलानी यांनी काम पाहिले. भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या संविधान सभेचा भाग असलेल्या 15 महिलांमध्ये त्या एक होत्या. अरुणा असफ अली आणि उषा मेहता यांच्याप्रमाणेच त्या भारत छोडो आंदोलनादरम्यान आघाडीवर होत्या. फाळणीच्या दंगलीत त्यांनी महात्मा गांधींसोबत काम केले.  


सुचेता कृपलानी यांची पहिली महिला मुख्यमंत्री बनण्याची रंजक कहाणी


सुचेता कृपलानी यांचा उत्तर प्रदेशशी काही संबंध नव्हता. त्या बंगालच्या होत्या आणि दिल्लीत शिक्षण झांलं होतं. विद्यमान मुख्यमंत्री बदलून त्यांना मुख्यमंत्री बनवले गेले. त्यामागची कथा खूपच रंजक आहे. खरे तर स्वातंत्र्यानंतर देशात काँग्रेसची सत्ता होती, पण एक वेळ अशी आली की पक्षाचे लोक नेहरूंच्या सत्तेला आव्हान देऊ लागले. आव्हान देणाऱ्या नेत्यांमध्ये यूपीचे मोठे नाव सीबी गुप्ता म्हणजेच चंद्रभानू गुप्ता यांचे होते.


गुप्ता यांचे नाव राज्यात इतके प्रसिद्ध झाले की दिल्लीत बसलेल्या नेत्यांना असुरक्षित वाटू लागले. त्यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर करण्यासाठी काँग्रेसने 1963 मध्ये कामराज योजना आणली. या योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक राज्यात पक्ष मजबूत व्हावा म्हणून जुन्या लोकांना त्यांची पदे सोडावी लागली. या योजनेअंतर्गत जवाहरलाल नेहरूंनी त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगितले. सीबी गुप्ता यांच्या राजीनाम्यानंतरच देशाला आणि उत्तर प्रदेशला  कृपलानी यांच्या रूपाने पहिली महिला मुख्यमंत्री मिळाली.


स्वातंत्र्यासाठी भूमिगत राहून आंदोलन
1940 मध्ये त्यांनी ऑल इंडिया महिला काँग्रेसची स्थापना केली. 1942 ते 1944 या काळात स्वातंत्र्यासाठी भूमिगत राहून आंदोलन केले. 1944 ला त्यांना अटक करण्यात आली.  1948 मध्ये विधानसभेसाठी पहिल्यांदा त्या निवडून आल्या. संसदेमध्ये 'वंदे मातरम' गाण्याचा पहिला मान सुचेता कृपलानींना मिळाला.


शिक्षण दिल्लीतील इंद्रप्रस्थ महाविद्यालयात आणि सेन्ट स्टीफन्स कॉलेजमध्ये झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुचेता बनारस हिंदू विश्वविद्यालयात इतिहासाच्या प्राध्यापिका झाल्या. त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सभाग घेतला. स्वातंत्र्यानंतरही त्या राजकारणात सहभागी होत्या. 1952 मधील पहिल्या लोकसभा निवडणुकीसाठी, त्यांनी KMPP तिकिटावर नवी दिल्लीतून निवडणूक लढवली.  


1969 मध्ये काँग्रेसचे विभाजन झाल्यानंतर त्यांनी मोरारजी देसाई गटासह NCO स्थापन करण्यासाठी पक्ष सोडला. फैजाबाद (लोकसभा मतदारसंघ) मधून एनसीओ उमेदवार म्हणून 1971 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 1971 मध्ये त्या राजकारणातून निवृत्त झाल्या आणि 1974 मध्ये मृत्यूपर्यंत त्या एकांतवासात होत्या.