Tamil Nadu Goddess Parvati Idol: तामिळनाडूतून 50 वर्षांपूर्वी चोरीला गेलेली पार्वती देवीची मूर्ती अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये सापडली आहे. ही मूर्ती कुंभकोणम शहरातील थंडाथोट्टम येथील नंदनपुरेश्वर शिवन मंदिरातून 50 वर्षांपूर्वी चोरीला गेली होती. न्यूयॉर्कमधील Bonhams ऑक्शन हाऊसमधून ही मूर्ती सापडल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) सोमवारी दिली आहे. ही मुर्ती चोरीला गेल्याची तक्रार 1971 मध्ये स्थानिक पोलिसांकडे करण्यात आली होती. यानंतर 2019 मध्ये के. वासूच्या तक्रारीवरून पुन्हा याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. हे प्रकरण प्रलंबित होते. मात्र पोलीस निरीक्षक एम. चित्रा यांनी या प्रकरणी तपास सुरु केल्याने सीआयडीचे याकडे लक्ष गेले.
सीआयडने या मूर्तीचा शोध लावण्यासाठी परदेशातील ऑक्शन हाऊस आणि संग्रहालयांमध्ये चौकशी सुरू केली. या प्रकरणी तपासादरम्यान जगातील विविध संग्रहालयांमधून माहिती घेण्यात आली. बरीच शोधाशोध केल्यानंतर शेवटी न्यूयॉर्कमधील Bonhams हाऊसमध्ये 50 वर्षांपूर्वी चोरीला गेलेली पार्वती देवीची मूर्ती सापडली.
पार्वती देवीच्या मूर्तीची माहिती
- ही मूर्ती 12 व्या शतकातील चोल राजवटीत बनवण्यात आली.
- मूर्तीची लांबी 52 सेमी आहे.
- पार्वती देवीच्या मूर्तीची किंमत 1,68, 26,143 आहे.
- साधारणपणे देवी पार्वती किंवा उमा माता दक्षिण भारतात उभी असल्याचे दाखवले जाते. ज्यामध्ये मुकुट घातला जातो.
चोल राजवट
- चोल हा तमिळ वंशाचा होता.
- दक्षिण भारतात 13व्या शतकापर्यंत चोलांचे राज्य होते.
- चोलांचा सर्वात प्रसिद्ध राजा करिकल चोल होता.
इतर महत्वाच्या बातम्या:
Venkaiah Naidu Farewell : कोणतंही काम नायडूंसाठी ओझं नव्हतं; पंतप्रधान मोदींकडून मावळत्या उपराष्ट्रपतींवर स्तुतीसुमनं
महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप? मुख्यमंत्री नितीशकुमार आणि भाजपमधील संघर्ष का वाढला? 'ही' महत्त्वाची कारणं