Maharashtra Cabinet Expansion: गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेल्या शिंदे सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या म्हणजेच मंगळवारी सकाळी 11 वाजता काही मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची शक्यता आहे. या शपथविधीसाठी राजभवनात दरबार हॉल राखीव ठेवण्याचे आदेश देखील देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याच दरम्यान शिंदे गटातील मंत्रपदाची शपथ घेणाऱ्या आमदारांची नावे जवळपास निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. यातच मुंबईमधील भायखळा येथील आमदार यामिनी जाधव आणि ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांची नावे आघाडीवर आहे. या दोन्ही आमदारांची ईडी चौकशी सुरु आहे. याच दरम्यान ते बंड करत शिंदे गटात सामील झाले. ईडीच्या चौकशीपासून वाचण्यासाठी ते शिंदे गटात सामील झाल्याचे आरोप अनेकवेळा शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात आले आहे.
शिंदे गटाची संभावित यादी
पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाने आपल्या राज्य भरातील जवळपास सर्व जिल्ह्यातील आमदारांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे. यातच काही आमदारांची पहिल्यांदाच मंत्रीपदी वर्णी लागणार आहे. शिंदे गटातील संभावित मंत्रिपदाची उमेदवार खालीलप्रमाणे आहे.
मुंबई : यामिनी जाधव, सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे
ठाणे : प्रताप सरनाईक, बालाजी किणीकर,श्रीनिवास वनगा
उत्तर महाराष्ट्र : दादा भुसे, गुलाबराव पाटील, सुहास अण्णा कांदे
पश्चिम महाराष्ट्र : शंभुराजे देसाई, अनिल बाबर, प्रकाश अबिटकर, महेश शिंदे
मराठवाडा : संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, संदिपन भुमरे
कोकण : भरत गोगावले, उदय सामंत, दीपक केसरकर
विदर्भ : संजय राठोड, संजय रायमुलकर
शिंदे सरकारच्या या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात काही अपक्ष पक्षच नेतेही मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. यात प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू, आशिष जैस्वाल, नरेंद्र भोंडेकर आणि गीता जैन यांचा समावेश आहे. यामध्येच भाजपासून चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर यांची नावे निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहेत. तसेच यामध्ये काही नवीन चेहऱ्यांना देखील भाजप संधी देऊ शकते.
इतर महत्वाच्या बातम्या:
Maharashtra Cabinet Expansion : मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं अखेर ठरलं! तारीख अन् वेळ निश्चित, राजभवनावर शपथविधी
Maharashtra TET Scam : टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या मुलांची नावं; प्रमाणपत्र रद्द, सत्तार म्हणाले...
मुख्यमंत्री आज नांदेड, हिंगोली दौऱ्यावर; दोन्ही जिल्ह्यात पावसाचा कहर मात्र दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विसर?