Vedanta Foxconn Project : आम्हा आंदोलन करतो तेव्हा शेमडी पोरं म्हणतात. त्यांच्याविरोधात बोललं लिहिलं की, पत्रकारांनाही वाट्टेल ते बोललं जातं. अजून शेती नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे नुकसानभरपाई पोहचण्याचा प्रश्नच नाही. यामचे नेते पोलीस स्टेशनच्या आवारात गोळ्या झाडतात. पण त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही, असं ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले आहेत. आज पत्रकार परिषद घेऊन ते असं म्हणाले आहे. या षटकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारला (shinde fadnavis government) लक्ष केलं आहे.
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले आहे की, वेदांता फॉक्सकॉन आज गुजरातमध्ये गेला आहे. तो गुजरातमध्ये गेला याचं वाईट वाटत नाही. मात्र इथला लोखो लोकांचा रोजगार गेला. त्याबद्दल कोणीच बोलत नाही. या मुद्यावर आमचा दावा खोटा आहे, असा आरोप झाला. तो महाविकास आघाडीच्या काळातच राज्याबाहेर गेला असा आरोप झाला. यावर आम्ही माहितीच्या अधिकारात अर्ज केला. ज्याला दीड महिन्यांनी उत्तर आलं आहे. त्याचा पुरावाच मी आणला आहे, असं ते म्हणाले. यावेळी पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी अनिल अग्रवाल यांना लिहिलेलं पत्र ही दाखवलं.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, हे पत्र आल्याचं मी सांगत होतो. पण ते माझ्या हातात नव्हतं. खोके सरकारमध्ये बसलेल्या आमच्याच लोकांनी मला हे सांगितलं होतं. उद्योगमंत्री, उपमुख्यमंत्री खोटं बोलतायत का? घटनाबाह्य मुख्यमंत्री तर यावर बोलतच नाहीत. माझं त्यांना खुलं आव्हान आहे की, त्यांनी माध्यमांसमोर माझ्याशी यावर चर्चा करावी. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून मला यावर उत्तर हवं आहे. ते म्हणाले, काल आमच्या सरकारला तीन वर्ष झाली असती. या काळात आम्ही कोट्यावधींचे प्रकल्प आणलेत. मात्र आज त्याचं श्रेय दुसरेच लाटत आहेत. हे खोके सरकार नको त्या गोष्टींच्या मागे धावत आहे. पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकर (Aditya Thackeray) यांनी शिंदे सरकारला लक्ष्य करत म्हणाले आहेत की, ''शिंदे सरकार कधी ना कधी महाराष्ट्रासाठी काम करणार आहे की नाही?''
इतर महत्वाच्या बातम्या: