Gram Panchayat Election: राज्यातील ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे 7751 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम  राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात 219 ग्रामपंचयातींचा यात समावेश असून, सोमवारपासून निवडणूक प्रकियेला प्रारंभ झाला आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी 3 अर्ज दाखल झाले असून त्यात 2 अर्ज थेट सरपंचपदासाठी असल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेने दिली आहे. उमदेवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 2 डिसेंबरपर्यंत असणार आहे. 

असा आहे निवडणूक कार्यक्रम... 

  • इच्छुक उमेदवारांना 28 नोव्हेंबर 2 डिसेंबरपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
  • दाखल अर्जांची 5 डिसेंबरला छाननी करण्यात येणार आहे.
  • तर 7  डिसेंबरला दुपारी 3  वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.
  • त्याच दिवशी दुपारी 3  वाजेनंतर निवडणूक चिन्हांचे वाटप केले जातील.
  • त्यानंतर प्रचार प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
  • दरम्यान, 18  डिसेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30  वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
  • तर 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

कोणत्या तालुक्यात किती ग्रामपंचायत 

अ.क्र. तालुका  सदस्य संख्या 
1 औरंगाबाद  35
2 पैठण  22
3 फुलंब्री  18
4 कन्नड  51
5 खुलताबाद  10
6 सिल्लोड  18
7 सोयगाव  05
8 वैजापूर  25
9 गंगापूर  35

महिलांनी मोठी संधी... 

जिल्ह्यात मुदत संपलेल्या 219 ग्रामपंचायतींच्या निवडणूक रणधुमाळीला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. ज्यात महिलांसाठी 50 टक्के सरपंचपदे आणि सदस्यपदे राखीव आहेत. त्यानुसार 109 किंवा 110 महिला थेट सरपंच होणार आहे. तर 1999  सदस्यांपैकी 959  किंवा 960  महिला सदस्य होतील.