Varsha Gaikwad मुंबई : मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा आहे. नाशिक लोकसभेतून (Nashik Lok Sabha Election 2024) माघार घेतल्यानंतर भुजबळांच्या नाराजीची चर्चा रंगली होती. त्यानंतर भुजबळांनी अनेकदा महायुतीला अडचण निर्माण होईल, अशी वक्तव्य केली होती. अलीकडेच राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2024) छगन भुजबळ इच्छुक होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी देण्यात आली. यावरून पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चा रंगलेल्या असताना काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना खोचक टोला लगावला आहे.
वर्ष गायकवाड म्हणाल्या की, नाशिकमध्ये जो विजय झाला आहे, त्या विजयाने सिद्ध केले आहे. त्यामुळेच छगन भुजबळ हे आता राज्यसभा मागत असावेत, परंतु हा प्रश्न त्यांचा पक्षांतर्गत आहे. अजित दादा म्हणाले आमच्यात मतभेद नाहीत. पण छगन भुजबळ हे राज्यसभा मागत होते हे निश्चित आहे.
वर्षा गायकवाडांचा भुजबळांना खोचक टोला
राजकारणात प्रत्येकाला अपेक्षा असते, राजकीय उमेद असणं काही चुकीचे नाही, पण छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली, पुन्हा शरद पवार यांची राष्ट्रवादी सोडली, जनता सर्व काही समजते. त्यामुळेच ते राज्यसभा मागत असावेत, असा खोचक टोला खासदार वर्षा गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळ यांना लगावला.
नाशिकच्या महायुतीच्या बैठकीला भुजबळ गैरहजर
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रणनीतीसाठी आज महायुतीची बैठक पार पडली. या बैठकीला छगन भुजबळ गैरहजर होते. नाशिक जिल्ह्यात असूनही छगन भुजबळ बैठकीला गैरहजर असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. याबाबत छगन भुजबळ यांनी सध्या वड्याचे तेल वांग्यावर असं सुरू आहे. मी नाराज असल्याच्या वावड्या उठवल्या जातात. प्रत्येक बैठकीला मी जाणे शक्य नसते. काही मीटिंगला आमचे पदाधिकारी जातात, असे म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
...तर आगामी निवडणुकीत वाईट परिस्थिती उद्भवणार'; अजितदादांच्या आमदाराचे महायुतीला खडेबोल