Hingoli Constituency Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) तोंडावर असतानाही महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) अजूनही जागावाटपाचं घोडं गंगेत न्हालेलं नाही. काही जांगावर महाविकास आघाडीचं एकमत झालेय. पण काही जागांवर तिढा अद्याप सुटलेला नाही. हिंगोली मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीमध्ये काथ्याकूट सुरु आहे. राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेसनंतर आता वंचितनेही हिंगोली मतदार संघावर दावा ठोकला आहे. वंचितमध्ये प्रवेश केल्यानंतर बीडी चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना हिंगोली मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचं सांगितलं.


युती जरी झाली तरी ही जागा वंचितलाच सुटेल -


मी कोणत्याही टर्म आणि कंडीशनवर पक्ष प्रवेश केला नाही.  माझ्या मनात काय आहे हे साहेबांनी सांगितलं आहे. शाखा आणि महिला युवक आणि ज्येष्ठांचा मेळावा असे तीन मेळावे घ्यायचे साहेबांनी सांगितलं आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघात पहिला मेळावा अती भव्य 1 लाखांपेक्षा जास्त नागरिकांच्या उपस्थितीत घेणार आहोत. 30-40 हजार युवक वंचितमध्ये प्रवेश करणार आहेत.  लोकसभाच नाही तर विधानसभा जिल्हापरिषद बाजार समितीचे उमेदवार आता ठरवणार आहोत.  अकोला पॅटर्न हिंगोलीमध्ये राबवणार आहोत. आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेला जागा सुटली तर ते आपल दुर्दैव संमजून बाळासाहेबांचा आदेश मनात काम करायचं. युती जरी झाली तरी ही जागा वंचितलाच सुटेल,  साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं मला लोकसभा लढवायची आहे, असे बीडी पाटील यांनी सांगितलं.  


शिवसेना का सोडली ?


मागील 15 वर्षांपासून शिवसेनेच्या हिंगोली लोकसभेचा संघटक म्हणून काम करत होतो. 2009, 2014 आणि 2019 या काळात मी पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी मागितली होती. प्रत्येक वेळेस मला भावी खासदार म्हणलं जायचं.  नवीन कोणाला तरी उमेदवारी द्यायची असं तीन वेळेस घडलं. त्यामुळे चौथी वेळेस घडण्याची चिन्हं आसल्याने  मी पक्ष बदलला असे बीडी चव्हाण म्हणाले.


'वंचित'नं दिलेल्या 39 मुद्यांच्या जाहीरनामा मसुद्यात आहे तरी काय?


दुसरीकडेत, वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडीचा (MahaVikas Aghadi) घटक पक्ष म्हणून सामील करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून चर्चा केली जात आहे. मात्र, महाविकास आघाडीला वंचित आघाडीकडून सातत्याने अटी शर्ती देण्यात येत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता वंचितकडून महाविकास आघाडीला 39 मुद्द्यांचा समावेश असलेला जाहीरनाम्याचा मसुदा सादर करण्यात आला आहे. या मुद्द्यांमध्ये राज्यातील संवेदनशील मराठा आरक्षणासह 39 मुद्यांचा समावेश आहे.  या मसुद्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षणावर सुद्धा भाष्य करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, आरक्षण या मुद्द्यांना सुद्धा वंचितकडून हात घालण्यात आला आहे. त्याचबरोबर अनेक नवीन मुद्दे सुद्धा या मसुद्यामध्ये समावेश करण्यात आले आहेत. 


आणखी वाचा :


Ramesh Chennithala meets Uddhav Thackeray : वंचितचा घोळ संपेना, अन् महाविकास आघाडीचं जागावाटप सुद्धा होईना; काँग्रेस प्रभारी थेट मातोश्रीवर ठाकरेंच्या भेटीला!