मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काही दिवसांपूर्वी भाजप पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसमधील १० ते १२ आमदारांचा गट फुटून बाहेर पडेल, अशी चर्चा होती. या भीतीने महाराष्ट्र काँग्रेसने गुरुवारी पक्षाच्या आमदारांना तातडीने मुंबईत बोलावले होते. मात्र, या बैठकीला अनेक आमदारांनी काही ना काही कारण पुढे करत दांडी मारली होती. यामध्ये लातूरचे आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांचाही समावेश होता. त्यामुळे अमित देशमुख चव्हाणांसोबत भाजपवासी झाले, अशी चर्चा रंगू लागली होती. मात्र, अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी शुक्रवारी काँग्रेसच्या लोणावळ्यातील शिबीराला उपस्थित राहत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.
यावेळी अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांविषयी स्पष्टीकरण दिले. काल लातूरला सांस्कृतिक कार्यविभागाचा पूर्वनियोजत पूर्वनियोजित कार्यक्रम होता. सांस्कृतिक कार्यविभाग माझ्या प्रमुख उपस्थितीत होता. त्यामुळे मला तिकडे उभे राहणे अनिवार्य होते. बाळासाहेब थोरात नाना पटोले परवानगी घेऊन गैरहजर होतो. मी इथे होतो, त्यामुळेच चर्चांना वाव मिळाला.
अमित देशमुख काय म्हणाले?
मला असं वाटतं अशोक चव्हाण साहेबांनी वैयक्तिक निर्णय जाहीर केला. आपण त्या खोलात जाऊ शकत नाही आपण पार्श्वभूमी कारणं त्याचा काय परिणाम काँग्रेस पक्षावर होणार नाही. ते पक्षातून बाहेर पडले. याचे दु:ख आहे. ते जायला नको होते, कौटुंबित संबंध होते. ते गेलेत म्हणून इतर लोक जातील, तसं नाही, असेही अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी स्पष्ट केले.
नाना पटोलेंकडून एककल्ली कारभार सुरु,अशोक चव्हाण माझा कट्ट्यावर काय म्हणाले?
नाना पटोलेंबाबत अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले, ज्यांच्यावर राज्य पातळीवर जबाबदारी आहे. त्यांच्याकडून एककल्ली कारभार सुरु आहे. बैठकीत जे ठरत ते ग्राऊंडवर जाऊन करावे लागते. एखाद्या व्यक्तीवर जबाबदारी दिली तर त्याच्या रिझल्टचाही विचार करायला हवा. गेल्या काही वर्षात प्रत्येक जिल्ह्यात मी कार्यकर्त्यांशी संपर्कात आहे. तिथे फार निराशा आहे. आज ज्या पद्धतीने काँग्रेसचा कारभार सुरु आहे. मला वाटतय की काँग्रेसमध्ये काहीच आऊटपूट दिसत नाही.
इतर महत्वाच्या बातम्या