Prakash Ambedkar मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) अजून एक महिना बाकी आहे. मी निवडणुकीपूर्वीच शरद पवार (Sharad Pawar) आणि दाऊद यांच्या भेटीचा मुद्दा महाराष्ट्र आणि संपूर्ण देशासमोर मांडला आहे. महाराष्ट्राला अंडरवर्ल्डचे राज्य हवे आहे का? असा प्रश्न उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी असे नको असेल, तर विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन ट्विटद्वारे केले आहे.


महाराष्ट्राला अंडरवर्ल्डचे राज्य हवे आहे का?


ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, जे गाढव विचारत आहेत की, शरद पवार आणि दाऊद इब्राहिम भेट हा 30 वर्षे जुना विषय आता का पुढे आणला आहे. त्यांच्यासाठी माझ्याकडे सरळ-सरळ उत्तर आहे की, मुंबई आणि देश धोक्यात आहे. बाबा सिद्दीकींची हत्या मुंबईचा काळा आपराधिक भूतकाळ आणि अंडरवर्ल्डचा एक फ्लॅशबॅक आहे. सगळ्यांना माहिती आहे की अंडरवर्ल्डने मुंबईत कोणाच्या मदतीने राज्य केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अजून एक महिना बाकी आहे. मी निवडणुकीपूर्वीच हा मुद्दा महाराष्ट्र आणि संपूर्ण देशासमोर मांडला आहे. महाराष्ट्राला अंडरवर्ल्डचे राज्य हवे आहे का? जर नसेल तर विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहनही ॲड. आंबेडकर यांनी केले आहे.


ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी चीनबद्दल चिंता व्यक्त केली होती, तीच चिंता मला - प्रकाश आंबेडकर


येणारी पाच वर्षे मुंबई आणि देशासाठी खूप महत्वाची आहेत. जर अंडरवर्ल्डचे मित्र पुन्हा सत्तेत आले तर अंडरवर्ल्ड पुन्हा मुंबईवर राज्य करेल आणि देशाची सुरक्षा धोक्यात आलेली असेल, असेही आंबेडकरांनी नमूद केले. ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी चीनबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे मी काल देशासमोर चिंता व्यक्त केली आहे. बाबासाहेबांनी चीनच्या विस्तारवादी योजनांबद्दल सावधान केले होते. परंतु, काँग्रेसने बाबासाहेबांचे ऐकले नाही, त्यानंतर काय झाले हे आपल्या सर्वांना माहिती आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.


शरद पवारांनी दुबईमध्ये दाऊदची भेट घेतली- प्रकाश आंबेडकर


 शरद पवार 1988-91 या काळात मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या एका दौऱ्यामध्ये त्यांनी दाऊद इब्राहिमची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मुंबई येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ॲड. आंबेडकर म्हणाले की, 1988-91 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते. त्यातील त्यांचा एक दौरा लंडनला होता. तिथून ते कॅलिफोर्नियाला गेले. तिथे ते दोन दिवस राहिले. त्यांची मीटिंग कोणासोबत झाली, त्याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे. कॅलिफोर्नियामधून शरद पवार लंडनला पुन्हा आले आणि दोन दिवस लंडनमध्ये थांबले. तिथून दुबईला गेले आणि दुबईमध्ये त्यांची दाऊद इब्राहीमसोबत विमानतळावर भेट झाली. त्यांना तिथे सोन्याचा हार घालण्यात आला असल्याचा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.  


हे ही वाचा