Maharashtra Budget 2022: राज्याचा 2022- 23 साठीचा अर्थसंकल्प 11 मार्च रोजी विधीमंडळात मांडण्यात येणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे शुक्रवारी दुपारी 2 वाजता हा अर्थसंकल्प मांडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज अर्थिक पाहणी अहवाल 2021-22 विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. या अहवालानुसार, राज्याच्या आर्थिक वाढीचा दर 12.1 टक्के राहील, असा अदांज वर्तवण्यात आला आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 8.9 टक्के वाढ अपेक्षित आहे.


आर्थिक पाहणी अहवालातील माहितीनुसार, 2021 - 22 मध्ये राज्यातील उद्योग क्षेत्रात 11.9 टक्के वाढ झाली आहे. तर सेवा क्षेत्रात 13.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच या अहवालात कृषि संलग्न कार्य क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य उत्पन्नात 4.4 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. तर पीक क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धी 3.0 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. 


अहवालातील पाहणी माहितीनुसार, राज्य सरकारने नोव्हेंबर 2021 पर्यंत 15 लाख 09 हजार 811 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह 21 हजार 216 औद्योगिक प्रकल्प मंजूर केले. तसेच नोव्हेंबर 2021 पर्यंत 74 हजार 368 कोटी रुपयांच्या 258 प्रकल्पांची नोंदणी, सप्टेंबर 2021 अखेर राज्यात 9 लाख 59 हजार 746 कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक झाली असल्याचे या अहवालात सांगणायत आले आहे. 


इलेक्ट्रिक व्हिकल धोरणातून वाढणार रोजगार 


या अहवालानुसार, राज्य सरकारकडे पाच इलेक्ट्रीक वाहन उत्पादकांचे प्रस्ताव आले आहेत. तर एक बॅटरी उत्पादकाचा 8420 कोटी रुपये गुतंवणूकीचा प्रस्ताव आला आहे. ज्यातून 9500 रोजगार निर्मिती अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच राज्यात राज्यात ऑक्टोबर 2021 अखेर 10 हजार 785 स्टार्टअप्स सुरू झाले आहेत.


रस्ते आणि मेट्रो


अहवालातील पाहणी माहितीनुसार, राज्यात 3.21 लाख किमीचे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेचे रस्ते हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी 55 हजार 33,532 कोटी रुपये खर्च अपेक्षित. डिसेंबर 2021 अखेर याचे 75 टक्के काम पूर्ण झाले असून यासाठी 39 हजार 945 कोटी रुपये खर्च 17 हजार 843 कोटी रुपये खर्चाचा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रगतीपथावर आहे. तसेच मुंबई किनारा रस्त्याचे 40 टक्के काम पूर्ण झालं असल्याचं यात सांगण्यात आलं आहे. 


रस्ते आणि मेट्रो


अहवालातील पाहणी माहितीनुसार, राज्यात 3.21 लाख किमीचे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेचे रस्ते हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी 55 हजार 33,532 कोटी रुपये खर्च अपेक्षित. डिसेंबर 2021 अखेर याचे 75 टक्के काम पूर्ण झाले असून यासाठी 39 हजार 945 कोटी रुपये खर्च 17 हजार 843 कोटी रुपये खर्चाचा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रगतीपथावर आहे. तसेच मुंबई किनारा रस्त्याचे 40 टक्के काम पूर्ण झालं असल्याचं यात सांगण्यात आलं आहे. तसेच मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत दहिसर ते डीएन नगर मेट्रोलाईन 2 ए. आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो लाईन 7 चे काम अंतिम टप्प्यात असून कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो लाईन 3 साठी 33 हजार 406 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. यासोबतच कासारवडवली मेट्रो लाईन 4 साठीची अंदाजित किंमत 14 हजार 549 कोटी कासारवडवली गायमुख मेट्रो लाईन 4 ए अंदाजित किंमत 949 कोटी आणि ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो लाईन 5ची अंदाजित किंमत 8417 कोटी खर्च अपेक्षित आहे. दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर आणि अंधेरी मेट्रो लाईन 9 ची अंदाजित किंमत 6 हजार 607 कोटी खर्च अपेक्षित आहे.