Mayawati on Election : काल पाच राज्याच्या निवडणुकांचे (Assembly Elections Result 2022) निकाल जाहीर झाले. यामध्ये भाजपने (BJP) प्रचंड बहुमताने यश मिळवले. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपने प्रचंड बहुमताने जागा जिंकून इतिहास रचला आहे. या निवडणुकीत भाजप आघाडीला 273 जागा मिळाल्या असून बहुमतासाठी 202 जागांची गरज आहे. तर 125 जागा समाजवादी पक्ष आघाडीच्या खात्यात गेल्या आहेत. मोठी गोष्ट म्हणजे मायावतींचा पक्ष बहुजन समाज पक्ष या निवडणुकीत केवळ एक जागा काबीज करू शकला. तर दोन जागा काँग्रेसच्या (Congress) खात्यात गेल्या. बसपाच्या (BSP) या पराभवावर आता मायावतींनी मोठं वक्तव्य केलं आहे.


मुस्लिमांनी मोठी चूक केली : मायावती


मायावती यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, "काल उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत बसपच्या अपेक्षेविरुद्ध आलेले निकाल पाहून पक्षाच्या लोकांनी निराश होऊ नये. योग्य कारणे समजून घेऊन धडा शिकून आपल्याला आपला पक्ष पुढे न्यायचा आहे आणि नंतर सत्तेत यायचंय. मात्र त्यांची संपूर्ण मते समाजवादी पक्षाकडे गेल्याने बसपाचे मोठे नुकसान झाले. मुस्लिम समाजाने बसपापेक्षा सपावर विश्वास ठेवण्याची मोठी चूक केली आहे


मायावती आणि ओवेसी यांना भारतरत्न - संजय राऊत


 दुसरीकडे शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपच्या विजयासाठी मायावती आणि ओवेसी यांना टोला लगावला आहे. भाजपच्या विजयात मायावती आणि ओवेसी यांचा मोठा वाटा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. या योगदानासाठी या दोन्ही नेत्यांना पद्मविभूषण आणि भारतरत्न द्यावे लागेल. शिवसेनेच्या पराभवावर संजय राऊत म्हणाले की, उत्तर प्रदेशातील काँग्रेस आणि शिवसेनेचा पराभव हा संवेदनशील राज्य असलेल्या पंजाबमधील भाजपच्या पराभवापेक्षा भीषण आहे.



यूपीचे निकाल काय?


उत्तर प्रदेश (एकूण जागा- 403)


अपना दल 12
बसपा 1
भाजप 255
काँग्रेस 2
जनसत्ता दल लोकशाही 2
निषाद 6
आरएलडी 8
समाजवादी पक्ष 111
एसबीएसपी 6


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Amit Shah : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचं मायावती यांच्याबद्दल मोठं वक्तव्य 


UP Election 2022 : उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतलं सर्वात मोठं कोडं- मायावती इतक्या शांत का?

BSP in Uttar Pradesh Election 2022: उत्तर प्रदेशात बसपाचा हत्ती 'बसला'; आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी