Congress Hath Se Hath Jodo: आता 'हात जोडो' म्हणजे काय? असे म्हणत, केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी काँग्रेसला डिवचले
Congress Hath Se Hath Jodo: काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gnadhi) यांच्या भारत जोडो यात्रेनंतर आता पक्षाला मजबूत करत थेट जनतेच्या दारावर जाण्यासाठी काँग्रेस 'हात से हात जोडो' हे अभियान घेणार आहेत.
Congress Hath Se Hath Jodo: काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gnadhi) यांच्या भारत जोडो यात्रेनंतर (Bharat jodo yatra) आता पक्षाला मजबूत करत थेट जनतेच्या दारावर जाण्यासाठी काँग्रेस 'हात से हात जोडो' हे अभियान घेणार आहेत. विशेष म्हणजे 26 जानेवारी पासून देशभरात याची सुरुवात होणार आहे. मात्र त्या आधीच जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील काँग्रेसने अभियानाला सुरुवात केली आहे. त्यातच भाजपाचे केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी हे काय आता नवीनच, भारत तुटलेला नसताना 'भारत जोडो'; 'आता 'हात जोडो' म्हणजे काय? असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री पाटीलांनी उपस्थित करून काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे आज कल्याण पश्चिम भागात नव्याने सुरु झालेल्या कोकण दूध डेरीच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत म्हणाले की, खासदार राहुल गांधी यांनी तर हाताला शंकराची उपमा केली, तर भारत जोडे यात्रेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतनंतर आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. यावर राज्यमंत्री पाटील यांनी थेट ठाकरे गटावर आरोप करत सांगितले की, हा त्यांच्या महाविकास आघाडीचा प्रश्न आहे. आम्ही काय भाष्य करणार त्यांच्याशी महाआघाडी करून कालच जयंती झालेल्या बाळासाहेबांच्या विचारांना किती पायदळी तुडवायची हा त्यांचा प्रश्न आम्ही काय भाष्य करणार? असे बोलत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ठाकरे पिता-पुत्रावर निशाणा साधला आहे.
दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शहापूर तालुका अध्यक्ष महेश धानके यांच्या नेतृत्वाखाली या अभियानाला वाशिंद पूर्व येथून ध्वजारोहण, पदयात्रा व चौकसभेच्या माध्यमातून आजच सुरुवात करण्यात आली. यावेळी तालुक्यातील कॉग्रेस पदाधीकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता भाजपचे राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या टीकेनंतर हे काँग्रेस पक्षाचे 'हात से हात जोडो' हे अभियान राज्यासह जिल्ह्यात ठाणे किती यशस्वी होते का? याकडे सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष असणार आहे.
दरम्यान, काँग्रेसचे 'हात से हात जोडो' हे अभियान प्रत्येक प्रदेश काँग्रेस कमिटीला राज्य स्तरावर राबवायचे आहे. गाव पातळी, ब्लॉक पातळी पासून तर तालुका व जिल्हा स्तरावर समांतर पद्धतीने स्थानिक नेते व पदाधिकारी याचे आयोजन करतील. हे 'हात से हात जोडो' अभियान राबवणार असून यात प्रभात फेऱ्या, पदयात्रा, बैठका, सभा यांचा समावेश असणार आहे. या माध्यमातून मतदारांच्या दारावर पोहचण्याचा काँग्रेस पक्षाचा उद्देश आहे.