Nitin Gadkari: ज्या दिवशी पद जातं, त्या दिवशी सर्व काही संपत, असं केंद्रीय केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. सामोवारी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे दिवंगत भगवतीधर वाजपेयी यांच्या जयंती कार्यक्रमाला संबोधित ते असं म्हणाले आहेत. ते म्हणाले की, मी पक्षाचा अत्यंत छोटा कार्यकर्ता आहे. आपल्या विद्यार्थीदशेच्या आठवणी सांगताना गडकरी म्हणाले की, मी कार्यकर्ता असताना वीज विभागातील कर्मचाऱ्यांशी मैत्री करायचो आणि रात्री पोस्टर्स चिकटवत होतो आणि नंतर मी विद्यार्थी नेता झालो.
नितीन गडकरी म्हणाले की, आज आपल्या देशात विचार शून्यतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. ते म्हणाले की, आमच्या पिढीने फारसा संघर्ष केला नाही. पण आमच्या पूर्वजांनी आमच्यापेक्षा जास्त संघर्ष केला. प्रतिष्ठा, मान-सन्मान नसलेल्या काळात त्यांनी संघर्ष केला आणि डिपॉझिट जप्त झाल्यानंतरही ते काम करायचे. गडकरी म्हणाले, मला अनेकदा एक गोष्ट आठवते. सर्व मोठ्या आणि उच्चपदस्थ नेत्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे. मुख्यमंत्री पुढे जाऊन माजी मुख्यमंत्री होतात. खासदार पुढे जाऊन माजी खासदार होतो. आमदार पुढे जाऊन माजी आमदार होतो. नगरसेवक पुढे जाऊन माजी नगरसेवक होतो, पण कार्यकर्ता कधीच माजी कार्यकर्ता होत नाही.
नितीन गडकरी म्हणाले की, अटलजींची विचारधारा आपण कधीही विसरता कामा नये. आज आपल्याला जी सत्ता मिळाली आहे, ती लाखो कार्यकर्त्यांच्या बलिदानामुळे आहे, असे ते म्हणाले. नितीन गडकरी म्हणाले की, लोकशाहीचे सर्व स्तंभ मजबूत असले पाहिजेत. आज मी झेड प्लस सुरक्षा कॅटेगरीत आहे. पण ज्या दिवशी पोस्ट जाईल त्या दिवशी सर्व काही संपेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, निवडणुका या लोकशाहीचा पाय आहेत. एखाद्या विचाराने काम केले पाहिजे. लोकशाही चार स्तंभांवर चालते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची विचारधारा आपण विसरता कामा नये.
इतर महत्वाच्या बातम्या:
Wedding : 14 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान तब्बल 32 लाख विवाहसोहळे होणार; 3.75 लाख कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल, CAIT च्या सर्वेक्षणातून स्पष्ट