Pramod Mahajan: प्रमोद महाजन यांच्या हत्येचा मास्टरमाईंड कोण? भाजपच्या दिवंगत ज्येष्ठ नेत्याच्या मुलीने सोळा वर्षांनंतर विचारलेल्या एका प्रश्नाने मुंबईतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रमोद महाजन यांचे धाकटे बंधू प्रवीण यांच्यावर खटला चालवला गेला आणि त्यांच्या हत्येसाठी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र आता पूनम महाजन याच्या वक्तव्याने सगळ्यांना आश्चर्यचकित केलं आहे. प्रमोद महाजन यांच्या हत्येमध्ये आणखी कोणाचा हात आहे आणि त्यांना संपवण्याचा मोठा कट होता का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. 


एनडीए सरकारमधील माजी मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते प्रमोद महाजन यांच्यावर त्यांचा धाकटा भाऊ प्रवीण यांनी 22 एप्रिल 2006 रोजी गोळी झाडली होती. त्यांचे मेहुणे गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना हिंदुजा रुग्णालयात नेले, जेथे बारा दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. 3 मे 2006 रोजी प्रमोद यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर प्रवीण यांनी वरळी पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. मात्र खटला सुरू झाला तेव्हा त्यांनी आपण दोषी नसल्याची कबुली दिली. प्रवीण यांनी काही खळबळजनक विधाने करण्यास सुरुवात केल्यानंतर कोर्टाची ही कारवाई काही प्रमाणात बंद खोलीत घेण्यात आली. पोलिसांनी सादर केलेले अनेक साक्षीदार आणि पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने प्रमोद महाजन यांच्या हत्येप्रकरणी प्रवीण यांना दोषी ठरवले. मात्र या प्रकरणात न्यायालयाने सुनावलेला संपूर्ण आदेश गुप्त ठेवण्यात आला. प्रवीण यांनी रागाच्या भारत प्रमोद महाजन यांची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. दोन भावांमध्ये आर्थिक मुद्द्यावरून वाद झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले. प्रवीण यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. मात्र पॅरोलवर घरी असताना ब्रेन अटॅक आल्याने त्यांचा मृत्यू झाला.


सोळा वर्षांनंतर 6 नोव्हेंबर 2022 रोजी प्रमोद महाजन यांची मुलगी पूनम यांनी आपल्या वडिलांच्या हत्येचा मास्टरमाईंड कोण, असा प्रश्न करून खळबळ उडवून दिली आहे. पूनम या उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. त्या एका कार्यक्रमात बोलत असता म्हणाल्या की, त्यावेळी वडिलांची हत्या कोणी केली, यामागचा मास्टरमाईंड कोण होता हे सरकारला माहीत नव्हते. प्रमोद महाजन यांची हत्या झाली तेव्हा महाराष्ट्रात आणि केंद्रात युपीए सरकार सत्तेवर असल्याने पूनम यांचे हे वक्तव्य राजकीय रंगात रंगलेलं वाटते. वडिलांच्या हत्येचा संदर्भ देत पूनम यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारख्या विरोधी पक्षांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. यातच "मास्टरमाईंड" या शब्दाच्या वापरामुळे लोकांसमोर जे उघड झाले आहे. त्यात आणखी बरेच काही आहे, यावर विचार करण्यास त्यांनी सर्वांना भाग पाडले आहे की, प्रवीण यांच्या व्यतिरिक्त अजून कोण होतं ज्याला प्रमोद महाजन यांची हत्या करायची होती? प्रमोद यांच्या हत्येचा काही मोठा कट होता का? प्रमोद यांची हत्या करून नंतर पोलिसांना शरण येण्याचे कृत्य प्रवीण यांनी लिहिले होते का? पूनम महाजन यांच्या राजकीय विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार प्रहार केला असून, जर त्यांना मास्टरमाईंड माहित असेल तर त्या त्याचं नाव उघड का करत नाही. 


प्रमोद महाजन यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय भूमिका बजावली. त्यांनीच 80 च्या दशकाच्या उत्तरार्धात शिवसेना-भाजपची भगवी युती केली होती. जेव्हा-जेव्हा दोन्ही बाजूंमध्ये वाद व्हायचा, तेव्हा प्रमोद हे दोन्ही बाजूंना सांभाळून वाद मिटविण्याचे काम करायचे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध होते आणि त्यांनी त्यांना खुश ठेवलं होतं. प्रमोद महाजन आज हयात असते तर 2019 मध्ये शिवसेना आणि भाजपमधील फूट टळली असती, असा विश्वास महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे.


संबंधित बातमी: 


'माझ्या बापाला कुणी मारलं, मला माहित आहे पण...', भाजपच्या जागर यात्रेत पूनम महाजनांचा आरोप