एक्स्प्लोर

Uddhav Thackeray Vidhan Parishad Election 2026: उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होणार?; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी काय काय घडतंय?

Uddhav Thackeray Vidhan Parishad Election 2026: काँग्रेसचे नेत्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षांच्या नेत्यांचाही उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी घ्यावी यासाठी आग्रह धरला आहे.

Uddhav Thackeray Vidhan Parishad Election 2026 मुंबई: महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीयांचं घोडं उमेदवाराबाबत अजूनही अडलेलंच आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वाट्याला येणाऱ्या एकमेव जागेसाठी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जावं, असा आग्रह काँग्रेस आणि शरद पवारांच्या गटाचा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतून विधान परिषद निवडणूकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला मविआ नेत्यांकडून आग्रह केला जात आहे. मात्र अर्ज भरायला 1 दिवस बाकी असताना अजूनही अधिकृत निर्णय झालेला नाही. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याबाबत अजूनही निर्णय घेतला नसला तरी उद्धव ठाकरे सोडून इतर उमेदवाराबाबतही अद्याप चर्चा झालेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे शेवटच्या दिवशी निर्णय घेऊन अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. आता उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेतात यावर सगळं अवलंबून आहे. (Uddhav Thackeray Vidhan Parishad Election)

काँग्रेसचे नेत्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षांच्या नेत्यांचाही उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी घ्यावी यासाठी आग्रह धरला आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडूनसुद्धा उद्धव ठाकरे यांचा मन वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी अजूनही निवडणूक लढवण्यासंदर्भातला निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून जर उद्धव ठाकरे निवडणूक लढवण्यास इच्छुक नसतील तर मग कोणता पर्याय समोर आणला जाणार? की महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते उद्धव ठाकरेंचं मन वळवण्यात यशस्वी होणार आणि उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवण्यासाठीचा आग्रह शेवटच्या दिवसांपर्यंत कायम ठेवणार हे पहावं लागेल. (Uddhav Thackeray Vidhan Parishad Election 2026)

...तर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता- (Uddhav Thackeray Vidhan Parishad Election 2026)

उद्धव ठाकरे 2020 मध्ये विधान परिषद सदस्य झाले. उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा कार्यकाळ 13 मे रोजी संपत असताना ते पुन्हा सभागृहात येतील का? याबाबत कमालीची उत्सुकता आहे. त्यांनी पुन्हा एकदा आमदारकी घ्यावी, असा त्यांच्या पक्षात आग्रह असल्याचे म्हटले जाते. आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याबाबत उत्कंठा आहे. ते रिंगणात राहिले तर निवडणूक बिनविरोध करण्याकडे भाजपचाही कल असेल. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा- (Vidhan Parishad Election 2026)

विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांची नाव समोर आली आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येणार आहे. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. (BJP Shivsena NCP Candidate List Vidhan Parishad Election 2026)

विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)

  • निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026 
  • उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
  • उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026 
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
  • मतदानाची तारीख: 12 मे 2026
  • मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
  • मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
  • निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026 

संबंधित बातमी:

Shivsena Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून एक नाव निश्चित; दुसऱ्या जागेसाठी शेवटच्या तासांपर्यंत सस्पेन्स कायम

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Fact Check :पीएम मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने आल्याचा व्हिडिओ, रेवती सुळेंच्या रिसेप्शनमधील असल्याचा दावा, पण व्हायरल व्हिडिओतील नेमकं सत्य काय?
Fact Check :पीएम मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने आल्याचा व्हिडिओ, रेवती सुळेंच्या रिसेप्शनमधील असल्याचा दावा, पण व्हायरल व्हिडिओतील नेमकं सत्य काय?
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Abhimanyu Pawar: अर्थखातं आणि सहकार खात्याकडून फाईलवर नेगेटिव्ह शेरा तरीही अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला 18 कोटींचं कर्ज, थेट मंत्रिमंडळानेच आदेश काढला, नक्की काय घडलं?
अर्थखातं आणि सहकार खात्याकडून फाईलवर नेगेटिव्ह शेरा तरीही अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला 18 कोटींचं कर्ज, थेट मंत्रिमंडळानेच आदेश काढला, नक्की काय घडलं?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाची संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाची संबंध नाही
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Embed widget