Uddhav Thackeray Hingoli, Buldhana Daura : शिवसेना ठाकरे गटाचे (Thackeray Group) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तयारीला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे आता बुलढाणा, हिंगोली दौरा करणार आहेत. उद्धव ठाकरे 22, 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी बुलढाणा (Buldhana), हिंगोली (Hingoli) लोकसभा मतदारसंघात दौरा करणार आहेत. बुलढाणा आणि हिंगोली या दोन लोकसभा मतदारसंघात दौरा करत उद्धव ठाकरे एकूण 10 सभा घेणार आहेत. उद्धव ठाकरे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात एकूण सहा सभा घेणार आहेत तर हिंगोली लोकसभा मतदारसंघात चार सभा घेणार आहेत.


ठाकरे गटाकडून लोकसभेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात


22 फेब्रुवारीला चिखली, मोताळा, जळगाव जामोद ज्या ठिकाणी जनसंवाद यात्रेदरम्यान उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. तर, 23 फेब्रुवारी रोजी शेगाव, खामगाव, मेहकर या ठिकाणी उद्धव ठाकरे सभा घेऊन पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि जनसामान्यांना संबोधित करणार आहेत. हिंगोली लोकसभा मतदारसंघात 23 फेब्रुवारीला सेनगाव, कळमनुरी या दोन ठिकाणी सभा घेतील तर 24 फेब्रुवारीला उमरेड आणि वसमत या दोन ठिकाणी सभा घेतील. या तीन दिवसाच्या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे शेगाव गजानन महाराज मंदिरात जाऊन दर्शन सुद्धा घेणार आहेत. 


उद्धव ठाकरे हिंगोली, बुलढाणा दौऱ्यावर


शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने नरेंद्र खेडेकर यांना बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे तर, हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी संदर्भात सस्पेन्स कायम आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडे असणार आहे. तर, हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट दोन्हीही आग्रही आहेत. 


शिवसेना शिंदे गटात असलेले बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीसाठी या लोकसभा मतदारसंघात मोर्चेबांधणीला उद्धव ठाकरेंनी सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या कोकण आणि मराठवाडा दौऱ्यानंतर  बुलढाणा आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघात जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने हा दौरा होत आहे. 


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बुलडाणा लोकसभा जनसंवाद सुधारित दौरा पुढीलप्रमाणे आहे.


22 फेब्रुवारी, गुरुवार



  • दुपारी 1 वाजता चिखली येथे जनसंवाद कार्यक्रम

  • दुपारी 3 वाजता मोताळा येथे जनसंवाद कार्यक्रम

  • संध्या 6 वाजता  जळगाव जामोद येथे जनसंवाद कार्यक्रम


23 फेब्रुवारी, शुक्रवार



  • सकाळी 10 वाजता संत श्री गजानन महाराज समाधी दर्शन

  • सकाळी 11 वाजता खामगाव येथे जनसंवाद कार्यक्रम

  • दुपारी 2 वाजता मेहकर येथे जनसंवाद कार्यक्रम 

  • दुपारी 3 वाजता मेहकर येथून हिंगोली कडे प्रयाण

  • हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सभा

  • दुपारी 4.15 वाजता सेनगाव येथे जनसंवाद

  • सायंकाळी 6.15 कळमनुरी येथे जनसंवाद


24 फेब्रुवारी, शनिवार



  • सकाळी 11.30 वाजता उमरेड येथे जनसंवाद

  • दुपारी 2 वाजता वसमत येथे जनसंवाद


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Riteish Deshmukh : रितेश देशमुख वडिलांच्या आठवणीत ढसाढसा रडला, हुंदके अन् अश्रू अनावर