रामाचं नाव घेण्याची भाजपची पात्रता नाही, देवस्थानच्या जमिनीही आता विकल्या जातील; उद्धव ठाकरे कडाडले
भाजपचा छूपा अजेंडा बाहेर आलाय, वक्फ बोर्डानंतर आता ख्रिश्चन, बौद्ध, जैन, हिंदू अशा सगळ्या देवस्थानच्या जमिनी भाजप त्याच्या मित्रांना देणार अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केलीय.

Uddhav Thackeray: रामाचं नाव घेण्याची पात्रता नाही. भाजपचा वर्धापनदिन तिथीप्रमाणे आहे का सोयीप्रमाणे? असा सवाल करत भाजप सर्व देवस्थानच्या जमिनी त्यांच्या मित्रांना देणार असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलीय. निवडणूक जिंकण्यासाठी वाढीव लाडकी बहीण योजना द्यायचं कबूल केलं होतं. कर्जमाफी देणार सांगितलं होतं. आता प्राण जाये पर वचन न जाये आहे. तुम्ही लोकांची फसवणूक करून मतं मिळवली आहेत. त्यामुळं रामाचं नाव घेण्याची त्यांची पात्रता नाही असं म्हणत शिवसेना (UBT) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. शिवसेनेच्या कम्यूनिकेशन विंगच्या विवरणप्रसंगी ते बोलत होते.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
भाजपच्या उद्याच्या वर्धापनदिनावरही ठाकरेंनी भाजपचा वर्धापनदिन तिथीनुसार आहे का सोयीनुसार असा सवाल करत रामासारखं वागण्याचा प्रयत्न करा असा भाजपला टोलाही त्यांनी लगावला.वक्फच्या निर्णयावर शिवसेनेकडून मोठी टीका हो असताना भाजपचं सगळं लक्ष त्यांच्या मित्रांवर आहे. वक्फ बोर्डाची सगळी जमीन आपल्या मित्रांना दे, ख्रिश्चन कमिटीच्या जमिनी मित्रांना दे, गुरुद्वारे, जैनाच्या, हिंदूंच्या जमिनी आपल्या मित्रांना देणार आहेत.यांचा आणि समाजाचा काही संबंध नाही. यामुळं आम्ही त्यांचा विरोध केलाय. ज्या पद्धतीनं त्यांनी हे सगळं बोलतायत.त्यानुसार त्यांचा छुपा अजेंडा ऑर्गनायझरने काढल्याचंही ते म्हणाले. द ऑर्गनायझरमध्ये असं छापून आलंय सिंघम सिनेमासारखं आयी रे आयी तुम्हारी बारी आयीसारखं ते वक्फ बोर्डाची जमीन आली. पुढची पायरी ख्रिश्चन समाजाची जमीन घेतील. मग बौद्ध, हिंदू अशा सगळ्या देवस्थानांची जमीन ते घेतील. मोक्याच्या जमीनी त्यांच्या मित्रांना देतील. अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली.धर्माधर्मात भांडण लावायचं, दंगली घडवायच्या, पोलीसांचा ससेमीरा लावायचा, केसेस अंगावर टाकायच्या. आणि दुसरीकडे जमीनी मित्रांना द्यायच्या. याला आमचा विरोध असल्याचंही ते म्हणाले.
कर्जमाफी देण्यावरून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य सध्या टीकेचं केंद्र बनत असताना, मुळात माणिकराव कोकाटेंवरच फसवणूकीचा आरोप आहे. ज्यांना कार्टाकडून आश्चर्यकारकरित्या निकाल लागल्यानं त्यांचं सदस्यत्व आणि मंत्रीपद वाचलं आहे. म्हणून ज्यांच्यावर फसवणूक झाल्याचा गुन्हा सिद्ध झालाय.पण शिक्षा न झाल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा:
संजय राऊतांनी सामनातून काँग्रेसचे विचार मांडायला सुरुवात केलीय, मंत्री योगेश कदमांचा टोला


















