एक्स्प्लोर

मराठी माणसांची तुलना पहलगाम अतिरेक्यांशी; उद्धव ठाकरेंचा आशिष शेलार अन् निशिकांत दुबेंवर जोरदार हल्ला

राज्यातील सर्व माध्यमांचे आभार मानतो, मराठीसाठी घेतलेल्या सभेला माध्यमांकडूनही सहकार्य झाले. मुंबईत मराठी माणसासोबत इतर भाषिक गुण्या-गोविंदाने राहत आहेत.

मुंबई : पहलगाममध्ये धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या अन् इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपत आहेत, असे म्हणत भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार (Ashish shelar) यांनी मनसेच्या मराठी भाषा आंदोलनावरुन हल्लाबोल केला होता. मराठीसाठी एकत्र येत ठाकरे बंधूंनी मेळावा घेतल्यानंतर भाजपकडून या मेळाव्यावर टीका होत आहे. विशेषत: उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लक्ष्य केलं जात आहे. त्यातच, भाजप खासदार निशिकांत दुबनेही वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात एकही उद्योग नाही, सगळं आमच्याकडे, आमच्या पैशांवर जगता अन् दादागिरी करता, असे अकलेचे तारे भाजप खासदाराने तोडले आहेत. आता, आशिष शेलार आणि निशिकांत दुबे (Nishikant dubey) यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी पलटवार केला आहे. 

राज्यातील सर्व माध्यमांचे आभार मानतो, मराठीसाठी घेतलेल्या सभेला माध्यमांकडूनही सहकार्य झाले. मुंबईत मराठी माणसासोबत इतर भाषिक गुण्या-गोविंदाने राहत आहेत. भाजपच्या बुडाला यामुळे आग लागली आहे, दुबेसारखे लकडबग्गे आहेत, जो आग लगाने की कोशिष कर रहै है.. असे म्हणत भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावर शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली. 

आमचा भाषेला विरोध नाही आमचा विरोध हिंदी सक्तीला आहे. आम्ही शिवसेना, शिवसैनिक जातपात धर्म न बघता मदत करत आहोत. मराठी माणसांची तुलना जे पहलगामच्या अतिरेक्यांशी करत आहेत, तेच खरे मराठीचे मारेकरी आहेत. हे हिंदूंनाही वाचवू शकत नाही, मराठीवर अन्याय करणाऱ्यांची बाजू घेत आहेत. मूळ भाजपा ज्यांची शिवसेनेसोबत युती होती ती ह्यांनीच मारुन टाकली.  आताच्या भाजपने उर बडवे घेतले आहेत, या पक्षातून त्या पक्षातून लोकं घेत आहेक. आम्ही एकत्र आल्याने महाजन याच्यासारख्या लोकांच्या बुडाला आग लागली आहे, असे म्हणत भाजप नेत्यांकडून आलेल्या प्रतिक्रियेवर उद्धव ठाकरेंनी पलटवार केला. 

निशिकांत दुबेंचं ठाकरे बंधूंना चॅलेंज

मराठीच्या मुद्द्यावरुन एकत्र आलेल्या राज आणि उद्धव ठाकरे यांची आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय युतीच्या दिशेने पावले पडण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपने ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रासह उत्तर भारतातील हिंदी भाषिके नेतेही ठाकरे बंधूंवर तुटून पडले आहेत. भाजपचे उत्तर भारतातील खासदार निशिकांत दुबे यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.  उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सध्या जे काही करत आहेत, त्यापेक्षा खालच्या दर्जाचं काहाही नसू शकते. आम्ही याचा प्रतिकार करणार. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माहीमच्या दर्ग्यासमोर जाऊन हिंदी किंवा उर्दू भाषिकाला मारुन दाखवावं. तरच मी मान्य करेन  की, उद्धव आणि राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहेत, अशी टीका निशिकांत दुबे यांनी केली.

हेही वाचा

अर्धनग्न अवस्थेत मनसे नेत्याच्या मुलाचा धिंगाणा; रिल्सस्टार राजश्री मोरेच्या कारला धडक, धमकीही दिली

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil: महायुतीच्या भांडणात गोकुळ अडचणीत, दररोज उठून डेऱ्यांना कोर्टात जावं लागत आहे; सतेज पाटलांचा हल्लाबोल, धनंजय महाडिकांना सुद्धा खोचक टोला
महायुतीच्या भांडणात गोकुळ अडचणीत, दररोज उठून डेऱ्यांना कोर्टात जावं लागत आहे; सतेज पाटलांचा हल्लाबोल, धनंजय महाडिकांना सुद्धा खोचक टोला
Sanjay Raut: 'भाजपत गेल्या 10 वर्षात नव्हती ती बंडाळी, मंत्रिमंडळात चार प्रमुख मंत्र्यांनी राजीनामा द्यायला नकार दिलाय, हेच मोदी जुने असते तर....' संजय राऊतांचा मोठा दावा
'भाजपत गेल्या 10 वर्षात नव्हती ती बंडाळी, मंत्रिमंडळात चार प्रमुख मंत्र्यांनी राजीनामा द्यायला नकार दिलाय, हेच मोदी जुने असते तर....' संजय राऊतांचा मोठा दावा
Ambernath BJP vs Shiv Sena: 'नगराध्यक्षांना टार्गेट कराल तर कल्याण-डोंबिवलीसारखी परिस्थिती होईल'; अंबरनाथ नगरपालिकेत भाजप-शिवसेनेत जुंपली; नेमकं काय घडलं?
'नगराध्यक्षांना टार्गेट कराल तर कल्याण-डोंबिवलीसारखी परिस्थिती होईल'; अंबरनाथ नगरपालिकेत भाजप-शिवसेनेत जुंपली; नेमकं काय घडलं?
Manoj Jarange : मराठ्यांवर किती जळणार? ओबीसींच्या नावावर सगळं खाल्लं, महाराष्ट्र सदनही सोडलं नाही; जरांगेंची भुजबळांवर टीका
मराठ्यांवर किती जळणार? ओबीसींच्या नावावर सगळं खाल्लं, महाराष्ट्र सदनही सोडलं नाही; जरांगेंची भुजबळांवर टीका

व्हिडीओ

Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Nagpur DJ BAN : महाराष्ट्राच्या उपराजधानीत डीजे बंदी झुगारली, नागपूरमध्ये डीजेच्या दणदणाटात लेझरसह दहीहंडी उत्सव सुरु
डीजे बंदी झुगारली, नागपूरमध्ये डीजेच्या दणदणाटात लेझरसह दहीहंडी उत्सव सुरु
Video: मुसळधार पावसामुळे दिल्ली-एनसीआर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी तुंबलं, प्रवासी अडकून पडले; आगमन विभाग काही काळासाठी बंद करावा लागला
Video: मुसळधार पावसामुळे दिल्ली-एनसीआर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी तुंबलं, प्रवासी अडकून पडले; आगमन विभाग काही काळासाठी बंद करावा लागला
आईच्या मृतदेहाशेजारी लेकीचा आक्रोश अन् मांडी घालून बसलेला हताश बाप; पदरी पैसा नसल्याने रुग्णवाहिका मिळालीच नाही, उत्तर प्रदेशातील भीषण चित्र
आईच्या मृतदेहाशेजारी लेकीचा आक्रोश अन् मांडी घालून बसलेला हताश बाप; पदरी पैसा नसल्याने रुग्णवाहिका मिळालीच नाही, उत्तर प्रदेशातील भीषण चित्र
काॅकरोच पार्टीचे दिल्लीत 3 तास धरणे आंदोलन, सीजेपी कार्यकर्तीच्या वडिलांना अमानुष मारहाण, आरोपी स्वत: पाॅडकास्टमध्ये म्हणाला, मी त्यांच्या डोक्यात हल्ला केला, 60 टाके पडलेत, पण जेलमध्ये गेलो नाही

Embed widget