धाराशिव : मोदीजी (PM Narendra Modi) तुमच्यावर संकट आलं तर मीही मदतीला धावून येईल, असं वक्तव्य उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, उद्धव ठाकरेंवर संकट आलं, तर मी पहिला त्यांच्या मदतीला धावून जाईन. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावर आता उद्धव ठाकरेंनीही प्रेमाने उत्तर दिलं आहे. यासोबत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानाना इशाराही दिला आहे. शनिवारी धाराशिव येथील प्रचारसभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 


मीही तुमच्या मदतीला धावून येईल, पण...


मोदी म्हणतात माझ्यावर संकट आलो, तर पहिला मदतीला येईन, आज मी सांगतो, मोदीजी तुमच्यावर कधी संकट आलं तर, मीही मोदीजी तुमच्या मदतीला धावून जाईन, पण तुम्ही संकट म्हणून महाराष्ट्रावर आणि देशावर आलाय, ते तुम्ही तुम्हालाच आवर घाला, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली आहे. धाराशिवमधील ओमराजे निंबाळकरांच्या प्रचार सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.


उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली


धाराशिवमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शाह तुम्ही मला काल काही मुद्द्यांवर बोलण्याचे आव्हान दिले होते.  सर्व मुद्द्यांवर बोलण्याची माझी तयारी आहे. जर तुमच्यात थोडीशी लाज असेल, तर जनतेच्या प्रश्नावर बोला. मराठवाड्याला पाणी केव्हा देणार? दहा वर्षात केंद्र सरकारने मराठवाड्याला काय दिलं? ईडी, सीबीआय यांचे घरघडी आहेत. मात्र 4 जून नंतर ते सर्व घरघडी आपल्याकडे येणार आहे. शिवसैनिकांना त्रास देणाऱ्या ईडी, सीबीआय पाहून घेऊ, असा इशारा उद्धव ठाकरे यांन दिला आहे.


मला खोटं ठरवायला निघाले आहेत


बाळासाहेबांच्या खोलीत दिलेलं वचन अमित शाहांनी मोडलं आणि मला खोटं ठरवायला निघाले आहेत. मी शेतकऱ्यांनी कर्जमुक्त करुन दाखवेन बोललो, दाखवलं की नाही? 10 रुपयात शिवभोजन थाळी दिली की नाही? कापसाला, सोयाबीनला भाव दिला होता की नव्हता? सगळे बाहेरचं उद्योग माझ्या राज्यात आणत होतो की नव्हतो? याचं उत्तर हो आहे. आता मोदी गॅरेंटी, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं का? दोन कोटी रोजगार मिळाले का? पिकविमा मिळाला? सगळ्यांना घर मिळालं? मग खोटं कोण बोलतंय, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. यावर गर्दीतून उत्तर आलं मोदी. उद्धव ठाकरेंच्या धाराशिवमधील सभेला शिवसैनिकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला.


मुस्लिम समाज आमच्यासोबत


मोदी म्हणतात इंडिया आघाडी जिंकली, तर पाकिस्तानला आनंद होईल. कशाला पाकिस्तानला आनंद होईल? आम्ही तर जाऊन नवाज शरीफचा केक खाऊन आलो नाही. आम्ही त्या जिन्याच्या कबरीवर डोकं ठेवून आलेलो नाही. मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आमच्यासोबत आलेला आहे.. मुस्लिम मला येऊन म्हणतात उद्धवजी आता तुम्हीच आमची अखेरची आशा आहात. त्यांना मी म्हणतो, मी तर हिंदुत्ववादी आहे, तर मुस्लिम मला म्हणतात तुमचा हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. आमचा हिंदुत्व घराची चूल पेटवणार आहे पेटवणारा नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. (Uddhav Thackeray Says I Will Help PM Narendra Modi If Needed)


पाहा व्हिडीओ : उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?



महत्त्वाच्या इतर बातम्या :


Uddhav Thackeray : मोदींवर बाळासाहेबांचं कर्ज, मग त्यांच्या खोलीत दिलेलं वचन का मोडलं? उद्धव ठाकरेंचा घणाघाती सवाल