धाराशिव : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) बाळासाहेब ठाकरेंचं (Balasaheb Thackeray) कर्ज आहे असं ते मानतात, मग त्यांच्या खोलीत अमित शाहांनी दिलेलं वचन का मोडलं? असा घणाघाती सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विचारला आहे. 


पंतप्रधान मोदींवर उद्धव ठाकरेंचा घणाघात


आज तुम्ही सांगता उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले. 2014 मध्ये मी इथे तुळजाभवानीचा आशिर्वाद घ्यायला आलो होतो आणि घरी गेल्यावर संध्याकाळी एकनाथ खडसेंचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की, वरून आदेश आहे की, शिवसेना आणि भाजप युती मोडायची, तेव्हा मोदींना माहिती नव्हतं का, असं उद्धव ठाकरेंनी विचारलं आहे.


मोदीजी तुमचे चेले-चपाटे काय करतायत तुम्हाला माहित नाही का?


माझी शस्त्रक्रिया झाली असताना मोदीजी तुम्ही जर माझी विचारपूस करत होता, तेव्हा तुमचे पाव मुख्यमंत्री आणि आमच्यातले गद्दार भेटीगाठी करत होते, आमचं सरकार कसं पाडायचं? ही नालायक माणसं मी आजारी असताना सरकार कसं पाडायचं याचं कटकारस्थान करत होते. मोदीजी तुमचे चेले-चपाटे काय करत आहेत, तुम्हाला माहित नव्हतं का?, असा सावाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.


मोदींवर बाळासाहेबांचं कर्ज, मग...


बाळासाहेबांच्या मोठं कर्ज आहेत, असं मोदीजी तुम्ही मानता. एकतर त्यांना बाळासाहेब म्हणून नका, त्यांना हिंदूह्रदयसम्राट म्हणा, ते हिंदूह्रदयसम्राट आहेत. हिंदूह्रदयसम्राट म्हणायला तुमची जीभ का अडखळते? हिंदूह्रदयसम्राटांचं तुमच्यावर कर्ज आहे हे तुम्हाला माहित आहे, तर त्याचं बाळासाहेबांच्या खोलीत अमित शाहांनी दिलेलं वचन मोडताना तुम्हाला माहित नव्हतं का.


मी तुळजाभवानीची शपथ घेतली, माझ्या आई-वडीलांची शपथ घेतली की अमित शाहांनी बाळासाहेबांच्या खोलीत ज्याला आम्ही मंदिर मानतो, त्या खोलीत अमित शाहांनी शपथ घेऊन शब्द दिला होता की, अडीच-अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद शिवसेना-भाजपमध्ये वाटलं जाईल, तो शब्द तुम्ही मोडला आणि मला खोटं ठरवायला निघालात, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला आहे. 


पाहा व्हिडीओ : धाराशिवमधून उद्धव ठाकरेंचा एल्गार



महत्त्वाच्या इतर बातम्या :


'मोदीजी, तुम्ही आजारपणात माझी चौकशी करता अन्..; उद्धव ठाकरेंचं जोरदार भाषण, टाळ्या अन् शिट्ट्या